आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याला पोलिसाकडूनच बेदम मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यास एका पाेलिस कर्मचाऱ्यासह पाच ते सहा तरुणांनी बेदम मारहाण केली. शुक्रवारी (दि. ६) रात्री वाजेच्या सुमारास ही घटना साईनगर, पंचवटी येथे घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेल्या या निवृत्त कर्मचाऱ्याचा तक्रार अर्ज घेत कारवाई तर सोडाच, या वृद्धावरच गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकारही घडला.
 
यासंदर्भात दौलत पगार यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार साईनगर येथे काही दिवसांपूर्वी शेजारील राहणाऱ्यांशी कचरा जाळण्यावरून वाद झाला हाेता. या वादातून संशयिताने आपल्या नातलग पोलिस कर्मचाऱ्यास बोलावून घेतले. हा संशयित कर्मचारी पाेलिस गणवेशावरच चार ते पाच तरुणांना घेऊन अाला त्याने पगार यांना घरातून बाहेर बोलावले. काही बोलण्याच्या आतच संशयित पोलिस कर्मचाऱ्यासह टोळक्याने पट्ट्याने बेदम मारहाण केली.
 
निवृत्त कर्मचारी असल्याने पगार सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याला पोलिसाकडूनच मारहाण यांनी तत्काळ पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेत संशयिताच्या विरोधात तक्रार दिली. मात्र, येथे एका सहाय्यक निरीक्षकाने या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास कायद्याचा डोस पाजत अदखलपात्र गुन्हा दाखल करत बोळवण केली. पगार यांचा मुलगाही पोलिस खात्यात सहाय्यक निरीक्षक पदावर नागपूर येथे कर्तव्य बजावत आहे. 
 
घटना घडल्यानंतर संबंधित सहाय्यक निरीक्षकास फोनवर माहिती दिली. मात्र, या अधिकाऱ्याने आपल्याच खात्यातील अधिकाऱ्यालाही मला कायदा शिकवू नका, असे सांगत त्या पोलिस कर्मचाऱ्यांची बाजू घेत त्यांना आता काय फाशीवर द्यायचे का, असे सांगितल्याने पगार यांच्या मुलाचा नाईलाज झाला. पोलिस खात्याकडून एका सेवानिवृत्त पाेलिस त्यांच्या सहाय्यक निरीक्षक मुलाची हेळसांड झाली याची चर्चा पंचवटी पोलिसांत सुरू आहे. 
 
पोलिस खात्यातील सेवेचे हेच का फळ... 
- पोलिस खात्यात काम करताना अनेक घरगुती वाद मिटवले. कचरा जाळण्यावरून वाद झाले होते. शेजारच्यांनी पोलिस कर्मचाऱ्याला बोलवून घेत मारहाण केली. एका पोलिस कर्मचाऱ्याने गणवेशात असूनही त्याच्यासह टोळक्याने येत बेदम मारहाण केली.
 
मुलगी पोलिस खात्यात आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. गंभीर प्रकार असूनही गुन्हा दाखल केला नाही. पोलिस खात्यातून निवृत्त झाल्यानंतर हेच फळ मिळाले. या प्रकरणी पाेलिस आयुक्तांची भेट घेणार आहे.
-दौलत पगार, सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी 
बातम्या आणखी आहेत...