आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Revenue Commissioner Eknath Davale,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समन्वयातून हरित कुंभ शक्य, विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नद्यांची स्वच्छता अबाधित राखतानाच त्या बाराही महिने वाहत्या ठेवण्याचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर ऐरणीवर आला आहे. त्यादृष्टीने सुरू झालेल्या हरित कुंभमेळ्याच्या संकल्प पूर्तीला वेळ लागणार असला, तरी निश्चित कृती आराखडा आणि विविध संस्था व संघटनांच्या समन्वयातूनच हा संकल्प सहजसाध्य होईल, असे प्रतिपादन विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी केले.
महापौर अ‍ॅड. यतिन वाघ व जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या हस्ते शनिवारी हरित कुंभ कार्यालयाचा महात्मा फुले कलादालनात शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी महसूल आयुक्त एकनाथ डवले बोलत होते. कार्यक्रमादरम्यान हरित कुंभाच्या बोधचिन्हाचेदेखील अनावरण करण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर स्वामी संविदानंद सरस्वती, आर. के. गावडे, मेळा अधिकारी महेश पाटील, स्वामी भक्तचरणदास, महापालिका अधिकारी यू. बी. पवार, राजेश पंडित, निशिकांत पगारे व अभिनेता चिन्मय उदगीरकर आदी मान्यवर उपस्थित होते. डवले यांनी कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या माध्यमातूनही स्वच्छतेचा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पाठविणे शक्य असल्याचेही नमूद केले. प्रत्येक विभागाला सपोर्ट सिस्टिम मेकॅनिझम तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.या वेळी स्वामी संविदानंद सरस्वती यांनीदेखील या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यू. बी. पवार यांनी केले. सूत्रसंचालन योगेश कमोद यांनी केले, तर राजेश पंडित यांनी आभार मानले.
एकत्रित प्रयत्न होणार
महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी सिंहस्थासह एकूणच संपूर्ण वर्षभराच्या काळात शहरात बाहेरून प्लास्टिक येऊ नये, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. तसेच, जनता आणि प्रशासनाच्या एकत्रित प्रयासातूनच कुंभमेळा हरित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही ते म्हणाले.
अनुकरणीय उपक्रम ठरेल
जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी नाशिकच्या हरित कुंभमेळ्याचे मॉडेल बनून त्याची सर्वत्र अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने प्रत्यक्ष कृती गरजेची असल्याचे सांगितले. नाशिकच्या उपक्रमांचे अनुकरण होण्याइतका हा प्रकल्प योग्य पध्दतीने राबविला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.