आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revenue Staff Strike Issue At Nashik, Divya Marathi

महसूल कर्मचारी पुन्हा उतरले रस्त्यावर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शासनमागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर महसूलसह विविध खात्यांच्या कर्मचारी संघटनांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. प्रवेशद्वारावरच आंदोलन केल्यामुळे सीबीएस ते मेहेर सिग्नल या परिसरात वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारकांना अर्धा तास त्याचा त्रास सहन करावा लागला.
फेब्रुवारी महिन्यातही कर्मचारी संघटनेने राज्यभर बेमुदत आंदोलन केले होते. त्यावेळी शासनाने मागण्या मान्य करण्याचे कबूल करत रास्त मागण्यांबाबत शासन आदेश काढण्याबाबतही अाश्वासित केले होते. मात्र, त्याकडेही शासनाने काणाडोळा केल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले अाहे. निवडणुकीपूर्वीच त्यावर निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला. दुपारी जेवणाच्या सुटीत निदर्शने करण्यात आली. या वेळी ‘हमारी युनियन हमारी ताकत,’ ‘कर्मचारी संघटनेचा विजय अस’ अशी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. आंदोलनात उत्तमराव गांगुर्डे, महेश आव्हाड, सुनंदा जरांडे, दिलीप थेटे, राजेंद्र आहिरे, ज्ञानेश्वर कासार यांच्यासह राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, चतुर्थ कर्मचारी संघटना, वनविभाग, जलसंपदा, आयटीआयच्या कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
* केंद्राप्रमाणे शैक्षणिक भत्ता, होस्टेल भत्ता मिळावा.
* कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी केंद्राप्रमाणे मिळाव्यात.
* महिला कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाने शिफारस केलेली बालसंगोपन रजा मंजूर करण्यात यावी.
* रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत .
* अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या पूर्वीप्रमाणेच तत्काळ कराव्यात.
* महागाई भत्त्यांची ३५ महिन्यांची थकबाकी त्वरित अदा करावी.
* केंद्राप्रमाणे पेन्शनचा किमान मासिक दर ३५०० रुपये करण्यात यावा.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मंगळवारी विविध मागण्यांप्रश्नी आंदोलन करताना महसूल इतर विभागांचे कर्मचारी.