आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कानोसा शेत मालाचा: कांद्याने गाठली साठी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने भाजीबाजारात कांद्याचे ग्राहक कमी झाले आहेत. त्यामुळे किरकोळ विक्रीसाठी जादा दराने कांदा घेण्याचा कोणताही धोका पत्करण्याच्या मानसिकतेत किरकोळ विक्रेते नाहीत. त्यामुळे दर तेजीत असेपर्यंत बाजारातून कांदा गायब राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरात वाढ झाल्याने नाशिकमधील मंडईत 60 रुपये किलो दराने कांदा विक्री होत आहे. त्यामुळे बाजारात अनेक महिला केवळ दराची चौकशी करून खरेदी टाळत होत्या. सोमवारी बाजार समितीत आवक वाढल्याने 150 ते 200 रुपये क्विंटलमागे घसरण झाली होती. पिंपळगाव बाजार समितीत सर्वाधिक पाच हजार 37 रुपये क्विंटल भाव मिळाला. प्रतिक्विंटल कांद्याला कमीत कमी 1100 रुपये, तर सर्वाधिक पाच हजार 37 रुपये दर होता. सरासरी चार हजार 380 ते चार हजार 451 रुपये दर मिळाला होता.

जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांदा आवक वाढली असल्याने कांदा दरात 200 रुपयांनी घट झाली; मात्र किरकोळ बाजारातील विक्रेत्यांनी पूर्वीच अधिक दराने कांदा खरेदी केला असल्याने बाजारात किलोचे दर हे 60 ते 65 रुपये किलो झाले आहेत.


राज्यातील प्रमुख शहरांतील दर
मुंबई 60-65
पुणे 68-70
नाशिक 60-62
नागपूर 60-62
अमरावती 50-55
जळगाव 40-45
अकोला 50-55


देशातील प्रमुख शहरांतील दर
दिल्ली 65-70
चेन्नई 55-60
बंगळुरू 60-62
पाटणा 60-62
इंदोर 60-62
भोपाळ 60-62
अमृतसर 65-70


कांद्याऐवजी कोबी
कांद्याचे दर वाढत असल्याने अंडा भुर्जीच्या दुकानांमध्ये, तसेच भेळभत्ता दुकानांमध्ये कांदा कमी कोबी अधिक टाकण्यात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोबीला मागणी वाढली असल्याने कोबीचेही 60 रुपये किलो दर झाले आहेत.

दिनांक 01 02 05 07 08 09 12
लासलगाव 6975 6 485 12 170 8915 9 890 000 0000
पिंपळगाव 6 495 8 751 11 647 7768 9929 6 381 13 825


गुंतवणूक परवडत नाही
कांद्यामध्ये गुंतवणूक करणे परवडत नाही. दर वाढत असल्याने ग्राहकांची संख्या रोडावली आहे. सध्या उपलब्ध असलेलाच कांदा विक्री करणार असून, नवीन कांदा तूर्तास खरेदी करणार नाही. रामदास कर्डिले, कांदा विक्रेते


घसरणीनंतर वाढ शक्य
बाजार समित्यांमध्ये सोमवारी अचानक कांद्याची आवक वाढली, त्यामुळे कांदा दरात घसरण झाली. मात्र, पुन्हा दर वाढण्याची शक्यता आहे. पप्पू पटेल, कांदा व्यापारी