आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काॅलेज युवकांकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसे जप्त, चार संशयित अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - शहरातीलगोळीबाराच्या घटना लक्षात घेत अंबड पोलिसांनी कडक पाऊल उचलत चार संशियतांकडून जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा जप्त करण्यात यश मिळवले अाहे. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत चार संशयितांकडून दोन दुचाकी, मोबाइलसह दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात अाली अाहे. चारही संशयित महाविद्यालयीन विद्यार्थी अाहेत. दरम्यान, शनिवारी संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २६ अाॅगस्टपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे अादेश दिले.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सापळा रचून अंबड परिसरातील माऊली लॉन्स परिसरातून चार संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, पाच मोबाइल, दोन दुचाकींसह दीड लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र सहारे यांच्यासह संपूर्ण पथकाने कारवाई करीत संशयित म्रीनल राजेश्वर उर्फ एम. के. राजू असामी (२१, रा. डीजीपीनगर), चंदन उर्फ दीपक ब्रह्मदेव दुबे (२१, रा. महालक्ष्मीनगर, अंबड), अभिषेक उद्धव विश्वकर्मा (१९, रा. स्वामीनगर, अंबड) प्रदीप केवट मंत्री उर्फ बाबा (२१, रा. दत्तनगर, अंबड) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस निरीक्षक संजय बांबळे, तुषार चव्हाण, दत्तात्रय विसे, शंकर काळे, धनंजय दोबाडे, चंद्रकांत गवळी, अवी देवरे, रावजी मगर, कैलास बच्छाव, भास्कर मल्ले, धनंजय गवारे, दुष्यंत जोपळे, विजय वरंदळ, कचेश्वर पानसरे यांच्या पथकाने कारवाई केली.

सखाेल तपास सुरू
या संशयितांकडूनआणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता अाहे. या संशयितांबराेबर अाणखी काेण अाहेत, याबाबत तपास सुरू अाहे. -अतुल झेंडे, सहा. उपायुक्त.

अंबड पोलिसांनी केलेल्या कारवाईत अटक करण्यात अालेले चार संशयित तसेच त्यांच्याकडून जप्त केलेल्या जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा, दोन दुचाकी, मोबाइल असा दीड लाख रुपयांचा एेवज.

संशयितांकडे महागडे मोबाइल
याटोळीतील सर्व युवक हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. कमी वेळात जास्त पैसे प्राप्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा मार्ग पत्करला असावा. त्यांच्याकडे महागडे मोबाइल आढळले. गुन्हेगारी कृत्यासाठी त्यांनी गावठी कट्टा जिवंत काडतुसे बाळगली असावीत, असा पाेलिसांना संशय अाहे.
बातम्या आणखी आहेत...