आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभर बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध सिडकोत कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात अंबड पोलिस ठाण्यातर्फे पाथर्डी फाटा, अंबड औद्योगिक वसाहत, त्रिमूर्ती चौक, उंटवाडी आदी भागात रिक्षातपासणी मोहीम शुक्रवारी राबविण्यात आली. यामध्ये कागदपत्रे न बाळगणे, बेशिस्त वाहन चालवणे, नियम न पाळणे अशा गुन्ह्यांत अडकलेल्या जवळपास 100 रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली.
त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर, विजयनगर, शिवाजी चौक भागात बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात नागरिकांच्या तक्रारी होत्या. अनेक रिक्षाचालक पेट्रोल चोरी व लूटमार करतात, अशा स्वरूपाच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. फ्रंटसीट बसवणे, इतर वाहनांना कट मारणे, जोरजोरात टेप वाजवणे, मोठ्याने हॉर्न वाजवणे या प्रकारांमुळे परिसरातील शांतता व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर नियंत्रणासाठी अंबड पोलिसांनी विशेष मोहिमेत शुक्रवारी जवळपास 100 वाहनांवर कारवाई केली. त्यात अनेक चालकांकडून दंड केला, तर अनेकांना समजही देण्यात आली. नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत करत अशाप्रकारची मोहीम नियमित राबविण्याची मागणी केली.

नागरिकांनी सहकार्य करावे

नागरिकांच्या सुरक्षेसाठीच पोलिस वाहन तपासणी मोहीम राबवत आहेत. रिक्षाचालकांच्या बेशिस्तीमुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था बिघडत आहे. त्यासाठी विशेष मोहीम असून, नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे.- व्ही. डी. श्रीमनवार, निरीक्षक, अंबड पोलिस ठाणे