सिडको - उत्तमनगर येथील रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी (दि. ३) सकाळी उघडकीस आला. ही आत्महत्या एका महिलेने केलेल्या आरोपामुळे झाल्याचा संशय व्यक्त करीत मृताच्या नातेवाइकांनी संशयित फळविक्रेत्या महिलेचा गाडा उलटवून ताे जाळण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबराव धर्मा सूर्यवंशी (५२) या रिक्षाचालकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राणेनगर येथील फळविक्री करणाऱ्या एका महिलेने सूर्यवंशी यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे मानसिक तणावात येऊन त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करीत संशयित महिलेचा गाडा नातेवाइकांनी उलटवून दिला. अंबड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत संशयित महिला तिच्या पतीस ताब्यात घेतले. या घटनेच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.