आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षा परमिटचे ३० पर्यंत होणार नूतनीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रिक्षांच्यारद्द झालेल्या परमिटचे नूतनीकरण करण्यास शासनाने मान्यता दिल्याने बहुतांश परवानाधारकांनी या संधीचा लाभ घेतला अाहे. या संधीपासून काेणीही वंचित राहू नये, म्हणून नूतनीकरणास मुदतवाढ देण्यात अाली अाहे. शासनाने नव्याने काढलेल्या अध्यादेशानुसार ३० नाेव्हेंबरपर्यंत रिक्षा परवाना नूतनीकरण करता येणार अाहे.
दरम्यान, परवान्याची मुदत संपूनही ज्यांनी नूतनीकरण केलेले नाही, त्यांच्यावर १६ तारखेपासून कारवाई करण्यास प्रारंभ झाला आहे. शासननिर्णयानुसार राज्यातील अाॅटाे रिक्षांचे परवाने रद्द झालेल्यांना संधी म्हणून १५ हजार रुपयांपर्यंतचे शुल्क भरून परवाना नूतनीकरणास परवानगी देण्यात अाली अाहे. त्यासाठी ३१ अॉक्टाेबरपर्यंत मुदत देण्यात अाली हाेती. मात्र, मुदतीत बहुतांश परवानाधारक रिक्षाचालक परवान्याचे नूतनीकरण करू शकले नाहीत. त्यामुळे अशा परवानाधारकांना ३१ नाेव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात अाली अाहे. दरम्यान, ज्यांनी १६ तारखेपर्यंत परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत अाहे. त्यामुळे परवाने रद्द झाले असतील अशा अाॅटाे रिक्षा परवानाधारकांनी शासन निर्देशानुसार सर्व प्रकारचे कर भरून नूतनीकरण करून घ्यावे, असे अावाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसाेड यांनी केले अाहे.
नूतनीकरण करण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन
..नूतनीकरण केल्यास अशी हाेईल कारवाई
{ परवानाधारकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल.
{ परवाने मुदतबाह्य झालेल्यांना नव्याने होणाऱ्या लकी ड्राॅमध्ये अपात्र ठरविण्यात येईल.
{ परवान्याशिवाय वाहतूक करताना अाढळल्यास अशा रिक्षाची नाेंदणी रद्द होईल.
{ परवान्याशिवाय वाहतूक करणारी रिक्षा जेसीबीद्वारे संपूर्णपणे ताेडण्यात येईल.
----------------------