आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जूनअखेर ‘शिक्षणहक्क’चे ९५ टक्के प्रवेश झाले पूर्ण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिक्षणहक्क कायद्यानुसार शाळांमधील २५ टक्के राखीव जागा भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने ऑनलाइन लॉटरी प्रक्रिया राबविली. परंतु, या प्रक्रियेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांना अनेक खासगी शाळांनी प्रवेश नाकारला असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध करताच, त्याची दखल घेत शिक्षण विभागाने शाळांच्या तपासणीसाठी पथक तयार करून ९५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळून देण्याचे कार्य केले. दरम्यान, दुसरी सोडत सोमवारी किंवा मंगळवारी काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
शाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटल्यानंतरही शिक्षणहक्क अंतर्गत प्रवेश देण्यासाठी शाळांकडून टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. खासगी शाळांतील नर्सरी वा पहिलीच्या वर्गांतील प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यानंतर सोडत काढून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शाळा देण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांचा या सोडतीत नंबर लागला त्यांना अडमिट कार्डचे वितरण झाले. मात्र, हे कार्ड दाखवूनही शाळा त्याची दखल घेण्यास तयार नव्हते. शाळांकडून होत असलेल्या अडवणुकीची तक्रार करण्यासाठी पालकांना शिक्षणाधिकारी, शिक्षण मंडळाच्या कार्यालयांत हेलपाटे मारावे लागले. या सर्व प्रकारावर ‘दिव्य मराठी’ने प्रकाशझोत टाकताच शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी पालिकेच्या २२ केंद्रप्रमुखांचे पथक तयार केले. या पथकाने १७८० पैकी १६८२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळून दिले. तसेच शाळांकडून नाकारलेल्या ६६० चा आकडाही ८८ वर आणला.

२२ केंद्रप्रमुखांचे नेमले विशेष पथक...
^शहरातील अनेक शाळांनी प्रवेश देण्यासाठी टाळाटाळ केल्याच्या तक्रारी पुढे आल्यानंतर शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी महापालिकेच्या २२ केंद्रप्रमुखांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाद्वारे ९५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळून देण्याचे कार्य करण्यात आले आहे. तसेच, ज्यांचे नाव पहिल्या लॉटरीमध्ये नव्हते, त्यांच्यासाठी पुढच्या आठवड्यात लॉटरी काढण्यात येणार आहे. -धनंजय कोळी, विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद
अशी अाहे आकडेवारी
१६८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश अातापर्यंत झाले पूर्ण
६६४ जण प्रवेशासाठी शाळेतच पोहोचले नाही
८८ अर्ज रिजेक्ट
बातम्या आणखी आहेत...