आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"शिक्षणहक्क' प्रवेश, २० एप्रिलपर्यंत मुदत , आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आर्थिक दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणहक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये (२५ टक्के) आरक्षित जागांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू असून, विद्यार्थी पालकांच्या मागणीवरून शिक्षण विभागातर्फे प्रवेशाच्या विहित मुदतीत वाढ करण्यात आली आहे. ऑनलाइन प्रवेश अर्जाची नोंदणी करताना सुरुवातीला तांंत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे शिक्षण विभागाच्या वतीने प्रवेशप्रक्रियेच्या विहित मुदतीत वाढ करण्यात आली असून, आता २० एप्रिलपर्यंत प्रवेश अर्जाची नोंदणी करता येणार आहे.
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत राखीव प्रवेशाची प्रक्रिया शाळांमध्ये सुरू आहे. शैक्षणिक वर्ष २०१६ २०१७ यासाठी पूर्व प्राथमिक (नर्सरी) प्राथमिक (पहिली) इयत्तेसाठी प्रवेशासाठी जिल्हाभरातील ५९०० जागांसाठी आतापर्यंत ३३६६ विद्यार्थ्यांचे अर्ज निश्चित झाले आहेत. ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेची विहित मुदत १५ एप्रिल रोजी संपुष्टात येणार होती. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी करताना अनेक अडथळे आल्याने उपलब्ध जागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे गरजू विद्यार्थी या प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे विहित मुदतीत २० एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०१६ २०१७ साठी नर्सरी आणि पहिली या वर्गांसाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. शाळांमध्ये दुर्बल घटकांतील २५ टक्के जागा आरक्षित ठेवण्याची तरतूद आहे. त्यांना मोफत प्रवेश देणे बंधनकारक असून, शाळांना प्रतिपूर्ती (शुल्क) शासनाकडून दिले जाते. शिक्षण हक्कच्या प्रवेशासाठी यावर्षी राज्यात नाशिकमध्ये पायलट प्रोजेक्ट राबविला जात आहे. मात्र, प्रवेशासाठीचे www.rte25admission.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ प्रवेशप्रक्रिया सुरू होताच क्रॅश झाले हाेते. त्यानंतर २५ मार्चनंतर प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असतानाही वारंवार तांत्रिक अडचणी अाल्याने शासनाकडून २० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात अाल्याने पालकांना प्रवेशाची प्रक्रियेत अर्जाची नाेंदणी करता येणार अाहे.

विद्यार्थ्यांचे आलेले अर्ज
३३६६
एकूण जागा
५९००

वंचितांना प्रवेशाची संधी
^दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्यांतर्गत शिक्षणाची संधी उपलब्ध असल्याने प्रवेशासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त पालकांनी या संधीचा फायदा घ्यायला हवा. - सायली काळे, शिक्षिका

३७३ शाळांमध्ये ५९०० जागा
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्य तत्त्वावर असलेल्या (अल्पसंख्याक) शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या शाळांमध्ये पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अनिवार्य असून, त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात ३७३ शाळांमध्ये एकूण ५९०० जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांनी ऑनलाइन अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी केले आहे.