आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकात रिक्षा-दुचाकी पेटवल्या, दोन गटांतील वादाची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - वर्षभरापासून वाहन जाळपोळीच्या घटना रोखण्यात पोलिस काहीशी यशस्वी होत असतानाच मंगळवारी पहाटे गंजमाळमध्ये एक रिक्षा व चार दुचाकी जाळण्यात आल्या. यामागे दोन गटांतील वाद अथवा पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंचशीलनगर भागात चाचा पॅलेसजवळ रिक्षा व चार दुचाकी पेटवून दिल्याने परिसरात धूर पसरला. रहिवाश्यांनी पोलिस व अग्निशमन दलाला कळविले. आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वाहने जळून खाक झाली होती. नसीर सलिम खान यांची रिक्षा (एमएच 15 झेड 9264) समीर शेख यांच्या दुचाकीसह (एम एच41 झेड 7704), पल्सर (एमएच 15 एडब्ल्यू 7863), स्कूटी (एम.एच. 15 बीजी7104) व सनी (एम एच. 15 पी 3330) या दुचाकीही जळाल्या.


वर्षभरानंतर..
चार वर्षांपूर्वी सिडकोतील पवननगर, कामटवाडे भागात एकाच रात्री 40 दुचाकी पेटवून दिल्या होत्या. त्यानंतर शहरात वाहन जाळपोळीचे सत्रच सुरू झाले. गेल्या वर्षी पालिका निवडणुकीच्या आठवडाभर आधी द्वारका चौकात एकाच रात्री चार खासगी जीप पेटवून देण्यात आल्या होत्या. पोलिस आयुक्त कुलवतंकुमार सरंगल यांनी पदभार घेताच गुन्हेगारांचा शोध घेत कारवाई हाती घेतली. त्यामुळे या घटना थांबल्या होत्या


समाजकंटकांचा शोध घेणार
या घटनेत वाहनमालकांनी कोणावरही संशय घेतलेला नसून कोणाशी वाद झाला नसल्याचेही सांगितले आहे. समाजकंटकांनीच हा प्रकार केल्याचा संशय असून त्या दिशेने कसून तपास केला जात आहे. गणेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त