आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ring Morgaged,Money For Bike Use For Animals Thirstiness

अंगठी गहाण ठेवली, बाइकसाठीची पुंजीही प्राण्यांच्या तहानेसाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रणरणत्या उन्हात काही भागात मनुष्यालाच पाण्यासाठी वणवण करावी लागते, तेथे पशू-पक्ष्यांचे काय? त्यांची तहान कशी भागणार, प्रखर उन्हात ते कसा तग धरणार, या चिंतेतून त्यांना थेट स्वत:च पाणी पुरविण्याचे काम येथील आवास संस्थेने हाती घेतले आहे. गौरव क्षत्रिय या तरुणाने तर खिशाचा विचारही करता ध्येयपूर्तीसाठी स्वत:ची सोन्याची अंगठी गहाण ठेवली आहे, तर वैभव मोगलने बाइक घेण्यासाठी वर्षभरापासून जमा केलेली पुंजी या मुक्या जनावरांची तहान भागविण्यासाठी हसत-हसत खर्च केली आहे. त्यामुळे आता सोन्याची अंगठी गहाण ठेवली, बाइकसाठीची पुंजीही प्राण्यांच्या या प्राण्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे.

वाढत्या उन्हामुळे कमी- कमी होत चाललेल्या पाणीसाठ्यांमुळे प्राणी आणि पक्ष्यानाही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शहरात पाणी असले तरीही जनावरांना खास पिण्यासाठी पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था नसते. ग्रामीण किंवा जंगली भागात तर परिस्थिती आणखी बिकट असते. शासकीय यंत्रणांचेही अपेक्षेप्रमाणे लक्ष नसल्याने अनेकदा प्राण्यांना पाण्यावाचून जीवही गमवावा लागतो. या चिंतेने अॅनिमल वेल्फेअर अॅण्ड अँटी हॅरॅशमेंट सोसायटी (आवास) या संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था करण्याचे व्रत त्यांनी हाती घेतले आहे. त्याची सुरुवातही झाली आहे. पाणी साठवणुकीसाठी ‘आवास’ने सिमेंटचे भांडे उपलब्ध करत शहरातील विविध चौकांमध्ये प्राण्यांसाठी पाणपोई सुरू केली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार ती त्या-त्या भागात बसविली जात आहे. शिवाय, पाणी भरण्यापासून ते स्वच्छ करण्याची जबाबदारी स्थानिकांवर सोपविली असून, नागरिकांनीही ती आनंदाने स्वीकारली आहे.

हरणांना टँकरद्वारे देणार पाणी
येवल्यातील हरणांसाठीही पाणथळे निर्मितीसह त्यात पाणी पुरविण्याची जबाबदारीही ‘आवास’ने घेतली आहे. तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असून, परवानगीसाठी वनविभागास पत्रही दिले आहे.

महिन्याला हवेत तीन लाख
शहरात सुरू केलेल्या पाणपोयांसाठी बराच खर्च आला. आता नवीन ठिकाणी भांडे लावण्यासाठी पैसे कमी पडत आहेत. येवल्यातील ममदापूर आणि राजापूर पशू-पक्षी संवर्धन क्षेत्रातही नवीन पाणथळे, त्यात प्लास्टिकची ताडपत्री, नियमित क्लोरिन आणि आठवड्याला देण्यात येणा-या पाणी टँकरसाठी खर्च येणार आहे. प्राण्यांची वाढलेली खुरं काढण्यासाठी प्रतिजनावर अकराशे रुपये खर्च आहे. संपूर्ण उपक्रमासाठी प्रतिमहिना तीन लाखांपेक्षाही अधिक खर्च येत आहे. शासकीय स्तरावर कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे शासनाच्या मदतीबरोबरच खासगी संस्था, पशू-पक्षी प्रेमी आणि स्वयंसेवी मदतगार संस्थांना मदतीसाठी ‘आवास’ने आवाहन केले आहे. मदतीसाठी गौरव क्षत्रिय यांच्या ८३८००८००५४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

चौघांचा नि:स्वार्थी पुढाकार
हाउपक्रम चौघांनी मिळून सुरू केला. गौरवने अंगठी गहाण ठेवून आलेल्या १८ हजार रुपयांतून प्रथम यास सुरुवात केली. नंतर वैभव मोगलने कॉलेजला जाण्यासाठी बाइक खरेदी करण्यासाठी वर्षभरापासून जमविलेले हजार ५०० रुपये िदले. एमबीए झालेल्या अभिजित महालेने हजार ५०० रुपये उपक्रमासाठी िदले. सेवानिवृत्त सीईओ रमेश अय्यर यांनी हजार रुपयांचा हातभार लावला. तसेच, थेट टँकरच खरेदी करत कायमस्वरूपी या उपक्रमासाठी देण्याचाही त्यांचा मानस आहे.

मदतीची गरज
‘आवास’च्याशाखा देशभर उभारण्यात येत आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, फरिदाबाद येथे त्या सुरूही झाल्या. बनारसला दोन आठवड्यांत सुरू होईल. उपक्रमासाठी शासनाची मदत अपेक्षित आहे. आता कसाबसा खर्च भागतोय, पण अधिक खर्च असल्याने त्यासाठी खासगी स्वयंसेवी संस्थांकडून मदत मिळावी. गौरवक्षत्रिय, अध्यक्ष, ‘आवास’