आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीच्या चक्रव्युव्हाचा रिंगरोडने भेद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची वाढती संख्या आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेसाठी महापालिकेने विकसित केलेला रिंगरोडचा आराखडा अंतिम टप्प्यात असून, त्याअंतर्गत आतील, बाह्य आणि मध्य अशा तीन स्वरूपातील रिंगरोडच्या निविदा प्रक्रियेस पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. त्यासाठी 362 कोटींचा निधी लागणार आहे.

शहर विकास आराखड्यातील हे महत्त्वपूर्ण काम मार्गी लागणार असल्याने शहरवासीयांच्या दृष्टीने वाहतूक समस्येची डोकेदुखी बर्‍याच अंशी दूर होईल. सिंहस्थासाठी आखण्यात आलेल्या आराखड्यात रिंगरोडच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत 21 किलोमीटरच्या रिंगरोडची कामे पूर्ण झाली आहेत. केवळ भूसंपादनाअभावी 61 किलोमीटर रस्त्यांची कामे बाकी होती. आता भूसंपादनाची प्रक्रिया हाती घेण्यात आल्याने पुढील महिन्यापासून निविदा प्रक्रियेला मुहूर्त लागणार आहे.

तिन्ही स्वरूपातील रिंगरोड
1) आतील रिंगरोड : 20 किलोमीटर - लेखानगर- राजसारथी-वडाळागाव-विजय ममता जंक्शन-टाकळीगाव- संगम ब्रिज- औरंगाबादरोड-अमृतधाम- गुंजाळ मळा-मेरी-मखमलाबादरोड-क्रांतीनगर-इंद्रप्रस्थ पूल- जुना गंगापूरनाका- जेहान सर्कल- एबीबी सर्कल- सिटी सेंटर मॉल-लेखानगर. उर्वरित. पान. 9

2)बाह्य रिंगरोड : 25 किलोमीटर
गंगापूररोड बारदान फाटा- मोतीवाला कॉलेज रस्ता- कार्बन कार्पोरेशन लि- त्र्यंबक रस्ता- पपया नर्सरी जंक्शन अंबड लिंक रोड- एक्स्लो पॉइंट- गरवारे जंक्शन- पाथर्डी फाटा- पाथर्डीगाव- वडनेरगेट- वडनेरगाव- लॅमरोड लोटस हॉटेल- वालदेवी पूल- देवळाली अमरधाम- देवळालीगाव- बिटको चौक, जेलरोड- जनार्दन स्वामी पूल- नांदूरगाव- जत्रा हॉटेल जंक्शन- म्हसरूळगाव- दिंडोरी रस्ता- जंक्शन- पेठरोड जंक्शन- हॉटेल राऊ- मखमलाबाद गाव- डावा तट कालवा- फॉरेस्ट नर्सरी पूल- जेहान सर्कल- गंगापूररोड.

3)मध्य रिंगरोड : 11 कि.मी.
नाशिक-पुणे- उपनगर जंक्शन- कॅनॉलरोड- गोसावी मळा- टाकळी दसक शीवरस्ता- औरंगाबादरोड- निलगिरी बाग- रासबिहारी जंक्शन- दिंडोरीरोड- गोरक्षानगर- पेठरोड- आरटीओ कॉर्नर- मखमलाबादरोड- फॉरेस्ट नर्सरी पूल.

रिंगरोडसाठी दीर्घ मुदतीचे कर्ज
महासभेने शहरातील रिंगरोड व महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 150 कोटींचे दीर्घ मुदतीचे तसेच सिंहस्थ पूर्वतयारीसाठी 200 कोटींचे कर्ज स्वरूपात मंजुरी दिली आहे. यासंदर्भात मागील वर्षी स्थायी समिती सभेनेदेखील मंजुरी दिलेली असल्याने निविदा प्रक्रियेचा मार्ग खुला झाला आहे.

सूक्ष्म नियोजन गरजेचे
रिंगरोडचा बाह्य सीमा म्हणून खूप चांगला वापर करता येऊ शकतो. विकसित होणार्‍या सर्वच शहरांमधून रिंगरोडची कामे हाती घेतली जातात. मात्र, त्याचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करायला हवे. ही कामे अत्यंत खर्चिक आहेत. त्यामुळे त्यात लोकांचा सहभाग असला पाहिजे. जमीन संपादनाअभावी कामे रखडली जातात. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी कमी वेळेत दळणवळण करण्यासाठी रिंगरोड उपयोगी ठरतात. शहरातील दाटीवाटीतून वाहने न आणता बाहेरच्या बाहेरून सुलभ प्रवास होण्याच्या दृष्टीने बाह्य रिंगरोड अत्यंत फायदेशीर असतात. सुलक्षणा महाजन, शहर नियोजन विषयातील तज्ज्ञ

मुख्य नऊ रस्ते जोडली जाणार
दिंडोरीरोड, पेठरोड, नाशिक-पुणे, नाशिक-औरंगाबाद हे दोन्ही राज्य महामार्ग तसेच मुंबई महामार्ग, गंगापूररोड, त्र्यंबकरोड, मातोरी या शहरात येणार्‍या मुख्य नऊ रस्त्यांना रिंगरोडने जोडले जाणार आहे.