आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकजवळ दोन समुदाय भिडले, गोळीबारात एक ठार; दोन पोलिस जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दंगलखोरांनी दुकानांतील सामान रस्त्यावर फेकले - Divya Marathi
दंगलखोरांनी दुकानांतील सामान रस्त्यावर फेकले
नाशिक - संशयित तरुणावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून होत असलेल्या टाळाटाळीच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला नाशिकजवळील हरसूलमध्ये गालबोट लागले. आंदोलकांचा उद्रेक शमवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाला.

हरसूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ दिवसांपूर्वी भगीरथ चौधरी (२०) या तरुणाचा मृतदेह जुबेर शेख नामक व्यक्तीच्या विहिरीत आढळला होता. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तो घातपात असल्याचा भगीरथच्या नातेवाइकांचा आरोप होता. पोलिसांनी पाण्यात बडून मृत्यू झाल्याचे सांगून प्रकार दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे हेाते. दरम्यान, याप्रकरणी बुधवारी सकाळी हरसूल गावकऱ्यांनी निषेध मोर्चा काढला. मोर्चात नागरिकांचा मोठा सहभाग असूनही पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त नव्हता. यामुळे आंदोलकांचा संताप झाला. दरम्यान, आंदोलकांनी संशयिताच्या घरावर चाल केल्याने प्रचंड गोंधळ माजला आणि दगडफेक सुरू झाली. अवघ्या पाच ते सहा पोलिसांच्या समोर हा प्रकार सुरू होता. ग्रामीण पोलिस दलासह एसआरपीच्या दोन तुकड्या गावात दाखल झाल्या. मात्र, आंदोलकांनी त्यापूर्वी गावात मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रामदास गंगाराम बुधर या तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. यात सुमारे २० पोलिस जखमी झाले.

नंतर, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि तालुका पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या फौजा याठिकाणी तैनात करण्यात आल्या. जखमी पोलिसांवर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत ३० लोकांना ताब्यात घेतले आहे आणि गावातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.
गृहमंत्री गेल्यानंतर आली फोर्स
त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री ध्वजारोहणासाठी आले होते. पोलिस अधीक्षकांसह सर्व पोलिस यंत्रणा बंदोबस्तात होती. दंगल सुरू झाल्यानंतर वेळेत फोर्स न आल्याने आंदोलकांनी घरांना आगी लावत सर्व गावासह तोकड्या पोलिस बंदोबस्तावर ताबा मिळवला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधीत छायाचित्रे
बातम्या आणखी आहेत...