आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंटेनर आणि स्कॉर्पिओत धडक: एकाच कुटुंबातील आठ जण ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड - मालेगाव-मनमाड राज्य मार्गावर मनमाडनजीकच्या कुंदलगाव शिवारात कंटेनर आणि स्कॉर्पिओत शनिवारी दुपारी 12 वाजता झालेल्या अपघातात शिर्डी येथे जाणार्‍या मध्य प्रदेशातील आठ साईभक्तांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेले मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील ठाकूर परिवाराचे सदस्य आहेत.

देवला (ता. मनावर, जि. धार) येथील हे भाविक नव्या स्कॉर्पिओने शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते. या वेळी अपघातात स्कॉर्पिओ थेट कंटेनरच्या खाली दबली गेल्याने तिचा चक्काचूर झाला. सरदार ठाकूर, ओमकार ठाकूर (वय 5), कुलदीप ठाकूर, निर्मला ठाकूर, संजीवनी ठाकूर, कंचन वास्केल, वास्केल, राजनंदिनी ठाकूर यांचा अपघातात मृत्यू झाला. राहुल ठाकूर व जमना ठाकूर हे दोघे जखमी.

राहुल, जमना बेशुद्ध
अपघातातून बचावलेले राहुल व जमना हे दोघेही तीव्र धक्क्याने बेशुद्ध पडले. रुग्णालयात आल्यानंतर जमना यांना अपघाताची कल्पना देण्यात आली. परंतु, मुलगा राहुलला याबाबत सांगण्यात आले नाही.

नवी कोरी स्कॉर्पिओ
अपघातग्रस्त स्कॉर्पिओ ही नुकतीच खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे तिला अद्याप नंबरही मिळालेला नव्हता. ही गाडी फक्त 2400 किलोमीटर चाललेली असल्याचे आढळले.

हिंमत होत नव्हती
अपघाताची भीषणता एवढी होती की, जवळ जायची हिंमत होत नव्हती. अखेर आम्ही सर्वांनी ग्रामस्थांच्या मदतीने स्कॉर्पिओत अडकलेले मृतदेह काढले. मुकेश ललवाणी, प्रत्यक्षदर्शी

नियतीने पोहचू दिले नाही
नवी गाडी घेतल्यानंतर शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी सहकुटुंब निघालो होतो; पण नियतीने आम्हाला पोहचू दिले नाही. जमना ठाकूर, जखमी

पुलर, मशीनचा वापर
स्कॉर्पिओचा अपघातानंतर कंटेनरखाली दबून चुराडा झाला होता. अखेर पुलर व मशीन लावून ती ओढून बाहेर काढण्यात आली.