आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक महामार्गावर भीषण अपघातात 12 ठार, 22 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक महामार्गावरील शहापूरजवळ असलेल्या लाहे फाट्याजवळ खासगी बसने इनोव्हा कारला धडक दिल्याने 9 जण ठार झाले असून 22 जण जखमी झाले. हा अपघात अतिशय भीषण होता. छायाचित्रांवरुन त्‍याची कल्‍पना येईल. व्‍हॉल्‍वो बस उलटून इनोव्‍हा गाडीवर आल्‍यामुळे इनोव्‍हाचा चेंदामेंदा झाला. जखमींना शाहपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीता ट्रॅव्‍हल्‍सच्‍या व्‍हॉल्‍वो बसने इनोव्हाला कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. आज (शनिवार) दुपारी 2 च्या सुमारास अपघात झाला. बस आणि इनोव्हा नाशिककडून मुंबईकडे जात होते.