आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थातील रस्तेकामांना मंजुरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील 10 महत्त्वाच्या रस्त्यांच्या 140 कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने मंजुरी दिली. यासाठी चौकांमधील अडथळे दूर करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती रमेश धोंगडे यांनी दिले.

शहरातील चौकांमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याची बाब सदस्य अशोक मुर्तडक यांनी निदर्शनास आणली. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आर. एम. बहिरम यांच्या दृष्टीने अतिक्रमण काढण्याचे नेमके निकष काय, असा जाबही विचारला. वाहतूक कोंडी दूर होण्याच्या उपाययोजना होणार असतील तर रस्त्यांच्या कामांना मंजुरी द्यावी, अशी सूचना सदस्यांनी केली. त्यावर सभापती धोंगडे यांनी सदस्यांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देत विषयांना मंजुरी दिली.

मोकाट श्वान निर्बिजीकरणाचे काम ‘सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अँनिमल्स, उदगीर’ या संस्थेकडून एक वर्षासाठी करून घेण्यास 75 लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्याचा विषय तहकूब ठेवण्यात आला.
भूसंपादनासाठी 50 कोटी

मौजे पिंपळगाव खांब, स. नं. 288/2 वरील रस्त्याकरिता 7100 चौ. मी. क्षेत्रासाठी 14 कोटी, तर तपोवन मलनि:सारण केंद्रासाठी 18 हेक्टर इतक्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी सर्वोच्च् न्यायालयाच्या आदेशानुसार 36 कोटी 22 लाख 11 हजार 595 रुपये जिल्हा बॅँकेत ठेव म्हणून जमा करण्यास सभेत मंजुरी देण्यात आली.


मंजुरी मिळालेल्या रस्त्यांची नावे - रक्कम
* निलगिरी बाग ते आगरटाकळी मलनि:सारण केंद्र ते सायखेडा रोड - आठ कोटी 76 लाख 70 हजार 33
* दिंडोरी रस्ता निमाणी चौक ते गोरक्षनगर - 9 कोटी 93 लाख 23 हजार 960
* मुंबई नाका ते सीबीएस ते अशोकस्तंभ - चार कोटी 27 लाख 99 हजार 34
* टाकळी रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. तीन ते टाकळीगाव ते राष्ट्रीय महामार्ग क्र. 50 - 12 कोटी 82 लाख 46 हजार 159
* दिंडोरी रस्ता वाघेरे रस्त्यापासून मनपा हद्दीपर्यंत - 12 कोटी 4 लाख 97 हजार 531
* पेठ रस्ता राऊ हॉटेल चौक ते मनपा हद्दीपर्यंत - 16 कोटी 43 लाख 93 हजार 655
* तपोवन लिंक रस्ता औरंगाबादरोडपासून लक्ष्मीनारायण पूल ते ड्रीम सिटी - 13 कोटी 84 लाख 33 हजार 161
* पेठ रस्ता गोदावरी डावा तट कालवा ते राऊ हॉटेल चौक - 13 कोटी 46 लाख 59 हजार 275
* दिंडोरी रस्ता गोरक्षनगर चौक वाघेरे रस्ता - 25 कोटी तीन लाख 70 हजार 28
* साईनाथनगर ते कलानगर चौक ते पाथर्डीगाव - 32 कोटी आठ लाख 30 हजार 479.