आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्ष्यांच्या घरट्यांवर रुंदीकरणाने संक्रांत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर बस आगाराकडे असलेल्या दहा एकराच्या विस्तीर्ण जागेत सुमारे शंभरहून अधिक वृक्ष असून, या गर्द झाडीत पक्ष्यांनी आपला अधिवास ठेवला आहे. विशेष म्हणजे नागरी वस्तीत फारसे न आढळणा-या वटवाघळासारख्या पक्ष्यांची संख्या येथे लक्षणीय आहे. नाशिक - पुणे महामार्गाचे होऊ घातलेले रुंदीकरण पाहता पक्ष्यांचा अधिवास असलेले वृक्ष आणि या पक्ष्यांच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पर्यावरण साखळीत महत्त्वाचे स्थान - दिसावयास कुरूप, रात्रीच्या वेळी बाहेर पडणा-या आणि म्हणून की, काय गैरसमजाचे गूढ वलय लाभलेल्या वटवाघुळांविषयी इतर पक्ष्यांप्रमाणे फारशी आस्था कुठेही आढळत नाही. या स्थितीत वटवाघुळांचे अस्तित्व राहिले काय अन् संपले काय त्या विषयी अनास्था दिसून येत आहे.
पर्यावरणातील महत्त्वाचा घटक - वटवाघळांच्या भूमिकेचे पर्यावरणास अत्यंत पूरक उपयोग होतात. नानाविध प्रकारच्या वनस्पतींचे परागीभवन त्यांच्या मार्फ त होते. त्यात औषधी वनस्पतींसोबत फळे व खाद्य वनस्पतींचा समावेश आहे. किडे- कीटक खाऊन उदरनिर्वाह करत असल्याने वटवाघळांकडून अत्यंत परिणामकारक असे जैविक नियंत्रण होते. - पी. आर. करपे, पर्यावरणाचे अभ्यासक व शिक्षक
कर्मचारी घेतात पक्ष्यांची काळजी - बस आगाराच्या आवारातील झाडांवर विसावलेल्या पक्ष्यांची एस.टी. कर्मचारी काळजी वाहतात. कोणत्याही कारणाने झाडावरून खाली पडलेली पक्ष्यांची पिले, तसेच जखमी पक्षी यांची देखभाल करून औषधोपचार केले जातात. - मधुकर नवले, बसचालक, सिन्नर आगार