आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कामे रखडल्याने रिंगरोडची दुरवस्था, कुंभमेळ्यापूवीै रस्त्याचे काम होईल पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अंतर्गत व बाह्य रिंगरोडचे कामे सध्या सुरू असले तरी, पाथर्डी फाटा ते वडनेर दुमाला या रिंगरोडचे काम अनेक दिवसांपासून रखडल्याने कुंभमेळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्णत्वास जाईल, का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

रिंगरोडच्या रुंदीकरणाचे काम काही दिवसांतच बंद पडल्याने ठिकठिकाणी या रस्त्याची पुरती वाट लागली असून, वाहनधारकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर नेहमी मोठी वर्दळ राहत असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कुंभमेळ्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून अंतर्गत व बाह्य रिंगरोडची कामे पूर्ण केले जाणार असून, सर्व रस्त्यांची कामे सध्या वेगाने सुरू आहेत.

शहरातील बहुतांश रस्त्यांची कामे सुरू असली, तरी पाथर्डी फाटा ते वडनेर या रस्त्याचे काम रखडले आहे. काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या कारणावरून हे काम बंद पाडण्यात आले होते. त्यानंतर दोन महिने उलटले असूनही या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. रखडलेले काम पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, वडाळा-पाथर्डी रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच पाथर्डी फाटा ते वडनेर या रस्त्याचे कामही सुरू असून, येत्या दोन-तीन सर्व यंत्रणा कार्यरत करून रस्त्याचे काम वेगाने सुरू करण्यात येईल, अशी माहिती संबंधित ठेकेदाराने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.