आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याची रुंदी कमी करण्याचा घाट, रामवाडीकडील रस्त्याबाबत स्थानिकांनी केला अाराेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विकास अाराखड्यातील अारक्षणांवरून नेहमीच हाॅट राहणाऱ्या नगररचना विभागातील कारभार पुन्हा एकदा चर्चेत अाला असून, गंगापूर नाका ते पंचवटीला जाेडणाऱ्या रामवाडीकडील २४ मीटर रस्त्याची रुंदी कमी करणे विरुद्ध बाजूला सरकवण्याचा घाट घातला जात असल्याचा अाराेप स्थानिक शेतकरी, जमीनमालक शिवसेना नगरसेवकांनी महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांना भेटून केला. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेना महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांनी रस्ता हलवणे वा रुंदी कमी करण्याचा प्रकार झाल्यास तीव्र अांदाेलनाचा इशारा दिला अाहे.

शिवसेना नगरसेविका मनीषा हेकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी अाक्रमक भूमिका घेतली अाहे. २००३ मध्ये गंगापूर नाका ते पंचवटी असा रामवाडी मार्ग लिंकराेड झाला. २४ मीटरच्या रस्त्यामुळे वाहतूक काेंडीच्या समस्येला उत्तर तर मिळालेच, शिवाय अशाेक स्तंभाकडून गंगापूरराेडकडे जाण्यासाठी सरळ रस्ता तयार झाल्याने वाहतूक काेंडीची समस्या सुटली हाेती. या रस्त्यासाठी भूसंपादन करण्यासाठी पालिकेने १८ काेटी रुपयेही माेजले. विशेष म्हणजे, तत्कालीन अायुक्त अधिकाऱ्यांनी जागा संपादनापूर्वी स्थळ निरीक्षण करून रस्ता बांधला हाेता. सद्यस्थितीत या रस्त्याचा पूर्णपणे वापर हाेत असताना काही स्थानिक विकसक लाॅन्समालकांना फायदा करून देण्यासाठी रस्त्याची रुंदी कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या अाहेत. यात पालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याची तक्रार करण्यात अाली अाहे. या पार्श्वभूमीवर २४ मीटर रुंद रस्त्यात बदल करू नये, अन्यथा वाहतुकीस अडथळा हाेईल. तसेच पालिकेचे अार्थिक नुकसान हाेईल, अशी भीती व्यक्त केली जात अाहे.

झारीतील शुक्राचार्य काेण?
रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा माेक्याच्या ठिकाणी असलेला संबंधित रस्त्याची रुंदी कमी करण्याचा घाट घातला जात अाहे. त्यात काही बिल्डर महापालिकेतील अधिकाऱ्यांचे संगनमत असून, अायुक्तांनी असे झारीतील शुक्राचार्य काेण? याचा शाेध घेऊन कारवाई करावी. शिवसेना हा डाव हाणून पाडणार. अजय बाेरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना