आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांवरील खड्ड्यांवरून खडखडाट, शिवसेनेकडून निकृष्ट कामाच्या चाैकशीची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जेमतेम वर्ष-दाेन वर्षांपूर्वी तयार करण्यात अालेले शहरातील अनेक रस्ते मुसळधार पावसामुळे खड्डेमय झाल्याचे बघून शिवसेनेने अाक्रमक पवित्रा घेतला अाहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई, तर जबाबदार अधिकाऱ्यांना मुंबई पालिकेच्या धर्तीवर निलंबणाची मागणी केली. सेनेसह अनेक नगरसेवकांनी थेट अायुक्तांकडेच वैयक्तिकरीत्या खड्ड्यांबाबत तक्रार केल्याचे बघून अहवाल मागवून तातडीने चाैकशीचे अादेश दिले.
शहरात ४०० काेटींचे रिंगराेड तयार करण्यात अाले. याबराेबरच काही मुख्य रस्त्यांचे अस्तरीकरण अन्य कामे करण्यात अाली. याबराेबरच काेेट्यवधींचा निधी खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली खर्ची पाडण्यात अाला. प्रत्यक्षात या रस्त्यांचे खरे रूप तीन दिवस चाललेल्या मुसळधार पावसात उघडे पडले. खासकरून गंगापूरराेड, कॅनडा काॅर्नरजवळ रस्त्यांवर हात जाईल इतके माेठे खड्डे पडले. त्यामुळे पालिकेच्या कामकाजाविषयी संशय व्यक्त करीत शिवसेनेने रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चाैकशीची मागणी केली. सेनेचे महानगरप्रमुख शिवसेनेचा अाक्रमक पवित्रा लक्षात घेत बांधकाम विभागाचे शहर अभियंता सुनील खुने यांनी तातडीने खुलासा करीत ज्या रस्त्यावर खड्डे पडले ते पाच ते दहा वर्षे जुने असल्याचा दावा केला अाहे. सध्या पावसाळ्यात तात्पुरती दुरुस्ती केली जाणार अाहे त्यानंतर डांबरीकरण केले जाणार असल्याचेही सांगितले. सिंहस्थ कुंभमेळ्यात महापालिका क्षेत्रात १६०१ किमीपैकी १०७ किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले अाहेत. त्यापैकी गंगापूरराेड दिंडाेरीवरील कामे अपूर्ण अाहेत. झाडे ताेडण्यास असलेल्या निर्बंधाची प्रमुख अडचण असून, रस्ते अस्तरीकरणाचे दाेन थरही अद्याप बाकी अाहेत. त्यामुळे काही ठिकाणी खड्डे दिसत असले तरी येत्या काळात हे रस्ते खड्डेमुक्त हाेतील. एवढेच नव्हे तर शासनाच्या माेर्थमध्ये दर तीन वर्षांनी रस्ते अस्तरीकरण करण्याचे नमूद केले असून, पाण्यामुळे डांबरातील हायड्राेकार्बन उडून जात असल्याचे त्यामागचे कारण अाहे. या पार्श्वभूमीवर १६०१ किमीपैकी ८५० किमी रस्त्याचे अस्तरीकरण करणे गरजेचे अाहे. अर्थिक खडखडाटामुळे साधारण ३९० किमी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम हाती घेतले जाणार अाहे. २५० किमी लांबीचे रस्ते दाेष निवारण कालावधीत असल्यामुळे ठेकेदारामार्फत त्याची दुरूस्ती केली जाईल असे खूने यांनी सांगितले.

अजय बाेरस्ते म्हणाले की, महापालिका देखभालीसाठी काेट्यवधी रुपये खर्च करते, ते नेमके काेठे गेले, हा संशाेधनाचा भाग अाहे. एवढेच नव्हे, तर ठेकेदारांवरही रस्ता केल्यानंतर तीन वर्षे देखभालीचे दायित्व अाहे. अशा परिस्थितीत रस्ते कसे उखडले, गुणवत्ता नियंत्रण विभागाने नेमके कशाचे परीक्षण केले, हे शाेधणे महत्त्वाचे झाले अाहे. सर्वप्रथम शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची माहिती घेऊन सविस्तर अहवाल महासभेवर ठेवावा त्यानंतर त्यावर चर्चा करून दाेषींवर कारवाई करावी, असेही अाव्हान त्यांनी अायुक्तांना दिले.

काेट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या पावसाळी गटार याेजनेचे चेंबर्स अक्षरश: फाेडून पाणी मुरवावे लागल्यामुळे या याेजनेच्या अयशस्वितेला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली.

अायुक्तांचीही दिशाभूल : खड्ड्यावरूनअाक्रमक झालेल्या शिवसेनेबाबत अायुक्तांना विचारणा केली असता, त्यांनी प्रथम खड्डे काेठे अाहेत, असा प्रतिप्रश्न केला. मला गाेदावरी पाहणीसाठी ज्या रस्त्यावरून नेण्यात अाले ते मात्र चकाचक असल्याचे त्यांनी सांगितले. कदाचित खड्डेमय रस्ते दाखवले नसतील मात्र असे रस्ते शाेधून कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या ठिकाणी उखडले रस्ते
गंगापूरराेड,कॅनडा काॅर्नर, शरणपूरराेड, महापाैरांचे ‘रामायण’ निवासस्थान, जुने पाेलिस अायुक्त कार्यालय, गंगापूर नाका, मखमलाबाद नाका, ड्रीम कॅसल, द्वारका उड्डाणपुलालगत, नाशिकराेड कॅनॉल राेड, सिडकाे, सातपूर.

महापाैरांनी तातडीने पाहणी करावी
^नव्या रस्त्यांवरखड्डे कसे पडले, काेट्यवधी रुपये काेठे मुरले, हे शाेधणे गरजेचे अाहे. महापाैरांनी तातडीने पाहणी करून या घाेटाळ्याची चाैकशी करावी. -अजय बाेरस्ते, महानगरप्रमुख,शिवसेना

बातम्या आणखी आहेत...