आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेड काढणार्‍यास बेदम चोप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - चॉकलेट देण्याच्या बहाण्याने सीबीएस परिसरात शालेय विद्यार्थिनीची छेड काढणार्‍या युवकास नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शहरातील एका शाळेतील दहावीच्या दोन विद्यार्थिनी शाळेत जात असताना, अनिकेत नावाच्या तरुणाने त्यांना चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला. त्यास या मुलीने नकार दिल्यानंतर युवकाने बळजबरी केली. मुलीने लोकांकडे मदत मागितल्याने नागरिकांनी या युवकास बेदम चोप देत त्याला वाहतूक पोलिसांच्या ताब्यात दिले. सरकारवाडा पोलिस ठाण्यात मुलीने युवकाविरुद्ध तक्रार दिली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टवाळखोरांचा उद्रेक : सीबीएस परिसरात शाळा आणि महाविद्यालय असल्याने येथे टवाळखोरांचे टोळके उभे असते. याठिकाणी शालेय विद्यार्थिनींची छेडछाड नेहमीच केली जाते. या टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.