आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेची मनमानी; पदपथांचा खर्च पाण्यात,शास्त्रशुद्ध अाधाराअभावी बहुतांश पदपथ उरले शोभेपुरतेच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेने रस्त्यांलगत बांधलेले नेमके काेणासाठी, असा प्रश्न शहरातून वावरणाऱ्या प्रत्येकालाच पडत असताे. वाढत्या अतिक्रमणांमुळे पदपथावर चालायलाही जागा राहिलेली नाही. शिवाय अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बांधलेले पदपथ पादचाऱ्यांसाठी गैरसोयीचेच आहेत. पदपथांवर काेट्यवधींचा खर्च हाेत असताना त्यांची उपयुक्तता शून्य असल्यामुळे जनतेचा कररूपी पैसा पाण्यात जात असल्याचे यातून स्पष्ट होत अाहे. महापालिकेत ट्रॅफिक सेल’चा स्वतंत्र विभाग असता तर पदपथांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने अवलाेकन हाेऊन त्यांच्या याेग्य वापरासाठी प्रभावी उपाययाेजना शक्य झाल्या असत्या. परंतु तो अस्तित्वात नसल्याने प्रशासन मनमानी पद्धतीने काम करते आहे.
शहर नियोजनात पादचारी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सायकल ट्रॅक, रिक्षा, खासगी वाहने या क्रमानुसार उपाययोजना करणे अपेक्षित बंधनकारकही आहे. परंतु, नाशिकमध्ये नेमके उलट्या क्रमाने नियोजन होते. त्यामुळे वाहतूक काेंडीत दिवसेंदिवस वाढच हाेत अाहे. पादचाऱ्यांसाठीच्या पदपथांची तर सद्यस्थितीत अतिशय दुरवस्था आहे. पदपथांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. हॉटेल, दुकाने, फेरीवाले आणि गॅरेजवाल्यांनी तर पदपथ बळकावत राजरोस व्यवसाय सुरू केला आहे. त्याशिवाय विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर, दूरध्वनींचे बॉक्स, बसथांबे, झाडे आदी शासकीय अतिक्रमणेही आहेत. पदपथ अतिक्रमणांत अडकल्याने पादचाऱ्यांना धोका पत्करून रस्त्यावरून चालावे लागत आहे. परिणामी अपघातही वाढले आहेत.

अनेक ठिकाणी अाेबडधाेबड पदपथांमुळे नागरिक रस्त्यावरून चालण्यास प्राधान्य देतात. मुळात मध्यवर्ती भागातील पदपथांची निर्मिती शास्त्रीय पद्धतीने झालेली दिसत नाही. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही पुरेसे पदपथ उपलब्ध झालेले नाहीत. त्याच्या रुंदीचे निकषही नसल्याने काही ठिकाणी अवघ्या दोन फूट रुंदीचाही पदपथ दिसून येतो. इंडियनराेड काँग्रेसचे काय अाहेत निकष? : "इंडियनरोड काँग्रेस'च्या निकषांनुसार ३० मीटर रस्त्यावर किमान तीन मीटरचा पदपथ, ४५ मीटरच्या रस्त्यावर साडेचार मीटर; तर साठ मीटरच्या रस्त्यावर सहा मीटर पदपथाची आवश्यकता आहे. तसेच, शहरातील मुख्य रस्त्यांवरील पदपथ किमान साडेतीन मीटर रुंद असावेत. रस्त्याची रुंदी वाढविण्यापेक्षा पदपथांची रुंदी वाढविल्यास वाहतुकीचा वेग कमी होऊ शकतो. पण याचे पालन होताना दिसत नाही. पदपथांची उंची किमान एक फूट हवी असते.