आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२०० काेटींच्या रस्त्यांसाठी ठेकेदारांना अायुक्तांची तंबी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थकुंभमेळ्या नंतर महापालिकेच्या उत्पन्नातून शहरामध्ये जवळपास २०० काेटी रुपयांचे रस्ते करण्यासाठी अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी तयारी सुरू केली असून, बुधवारी (दि. २०) कडक अटी शिथिल करण्याची मागणी घेऊन गेलेल्या ठेकेदारांना त्यांनी ‘नियमानुसार काम झाले नाही, तर मात्र खैर नाही’, अशी कडक तंबीच दिल्याचे समजते. बॅचमिक्स तंत्राद्वारे डांबरीकरण खडीकरणासाठी स्वत:ची यंत्रे प्रकल्प अनिवार्य असून, तांत्रिक तज्ज्ञाशिवाय कामे हाेत असल्याचे अाढळले तर जबाबदार धरू, असा इशाराही त्यांनी या ठेकेदारांना दिल्याचे सांगण्यात येते.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळामध्ये शहरात जवळपास ४५० काेटी रुपयांची रस्त्यांची कामे झाली. ही कामे करताना अायुक्तांसह बांधकाम विभागाने ठेकेदारांच्या मुसक्या अावळल्या हाेत्या. सात वेगवेगळ्या गुणवत्ता नियंत्रणासाठी संस्थांना पत्र दिल्यामुळे ठेकेदारांना निकृष्ट काम करण्यासाठी मार्गच उरला नव्हता. दरम्यान, अायुक्तांनी स्वत: काही रस्त्यांची अचानक पाहणी करून काेणते साहित्य कशा पद्धतीने यंत्रे वापरली जातात याची तपासणी केल्यामुळे ठेकेदारांची धांदल उडाली हाेती. अाॅगस्ट २०१५ मध्ये शासनाने एक अादेश काढून ठेकेदारांना माेठी कामे करताना स्वत:कडे काेणती यंत्रणा असली पाहिजे, याचे निकष सांगितले हाेते. त्यानुसार जे ठेकेदार पात्र ठरतील त्यांनाच कामे देण्याच्या सूचना देण्यात अाल्या हाेत्या. त्याबाबत काही ठेकेदारांमध्ये संभ्रम असल्यामुळे किंबहुना त्यांच्या मते अटीच जाचक असल्याने अायुक्तांनी त्यात शिथिलता द्यावी, अशी मागणी करण्यात अाली. मात्र, एकट्या-दुकट्याशी चर्चा करता महत्त्वाचे संघटनेचे पदाधिकारी बाेलवा, असे सांगितल्यावर काही निवडक ठेकेदारांनी पुन्हा अायुक्तांची भेट घेतली. यावेळी अायुक्तांनी ‘प्रत्येक काम तपासण्यासाठी अाता मुबलक वेळ असल्यामुळे गुणवत्तापूर्ण कामे कशी हाेतील याची तुम्हीच दक्षता घ्यावी’, अशा स्पष्ट सूचना ठेकेदारांच्या प्रतिनिधींना केल्या. ठेकेदार स्वत: अभियंता नसेल, तर त्याने सक्षम तंत्रज्ञाला नियुक्त करून कामाची देखरेख ठेवावी, बॅचमिक्ससारखे गुणवत्तापूर्ण डांबर, तसेच खडीकरणासाठी स्वत:चा खडीचा प्रकल्प असला पाहिजे, अशा शासन नियमानुसार बंधनकारक असलेल्या अटींचे पालन करावे, याचीही जाणीव अायुक्तांनी करून दिली.

अाता तपासणीसाठी वेळच वेळ...
अायुक्तांनी चार वेगवेगळी अभियांत्रिकी महाविद्यालये अाणि संस्थांमार्फत रस्ते तपासणार असल्याचेही सांगितले. मात्र, त्यांची नावे अाताच जाहीर हाेणार नाहीत, तसेच काेणाकडे काेणते काम जाईल, हे एेनवेळी ठरविले जाईल. मुख्य म्हणजे, अाता वर्षभर कामाचा फारसा ताण नसल्यामुळे आणि स्वत:कडेच तपासणीसाठी भरपूर वेळ असल्याचे सांगत ‘ग्राउंड लेव्हल’वर जाऊन तपासणी हाेईल, असेही स्पष्ट केले.

मनसेसह नगरसेवकांना दिलासा
अायुक्तांनी नवीन रस्ते, जुन्यांचे अस्तरीकरण अशी प्रक्रिया सुरू केली आहे. जेमतेम वर्षभरावर अालेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेसह नगरसेवकांसाठी ही बाब दिलासादायक ठरणार अाहे.