आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांची तात्पुरती दुरुस्तीही निकृष्टच, ‘त्या’ रस्त्यांची पुन्हा दुरुस्ती केली जाईल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्मार्टसिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहरातील समस्यांचा पाढा मात्र काही केल्या संपत नसल्याचेच चित्र अाहे. पाणी, वीज, अाराेग्य अशा एक ना अनेक समस्यांनंतर अाता रस्त्यांची समस्याही डाेके वर काढू लागली अाहे. गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांतील रस्त्यांची माेठ्या प्रमाणावर चाळण झाली हाेती. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी, तसेच प्रसारमाध्यमांच्या पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपातील कामांतर्गत शहरातील अशा रस्त्यांची दुरुस्ती केली.
अाता तब्बल पंधरा ते वीस दिवसांत जास्त तीव्रतेचा पाऊस पडला नसतानाही या रस्त्यांची पुन्हा चाळण झाली असून, संपूर्ण मुरूम, खडी रस्त्यावर पसरली अाहे. यामुळे वाहने घसरून पडण्याचे, टायर पंक्चर हाेण्याचे, अपघातांचे तसेच शारीरिक व्याधी जडण्याचे प्रमाण वाढले अाहे. विशेष म्हणजे, तात्पुरत्या स्वरूपातील कामांचा दर्जा इतका ‘तात्पुरता’ असेल, याबाबत नागरिकांनी अाश्चर्य व्यक्त केले असून, विनाकारण हाेणाऱ्या या अवास्तव खर्चापेक्षा याेग्य उपाययाेजनांतून समस्यांवर मात करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया ‘डी.बी. स्टार’कडे दिल्या अाहेत. शहरात पाहणी केली असता, बऱ्याच ठिकाणी अशाप्रकारे रस्त्यांची चाळण जीवघेणी ठरत असल्याचे दिसून अाल्याने पालिकेच्या दर्जाहीन कामांची प्रचिती पुन्हा एकदा अाली.

संशयास्पद कामे...
खड्डे बुजवणे वा रस्त्याची डागडुजी करणे ही कामे याेग्य पद्धतीनेच व्हायला हवी. मात्र, पालिका अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष हाेत असल्याने ती निकृष्ट दर्जाची केली जात असून, या कामांमध्येही अर्थलाभ शाेधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय बळावताे अाहे.

पेव्हर ब्लॉक दुरुस्तीचाही विसर
शहरातील प्रमुख वाहतूक बेटांच्या परिसरात सुशोभीकरण तसेच पावसाचे पाणी साचू नये या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून पेव्हर ब्लॉकचा पर्याय अवलंबविण्यात अाला हाेता. मात्र, या पेव्हर ब्लाॅकच्या नियमित देखभाल दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाकडून डाेळेझाक केली जात असल्याने अाजघडीला अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक उखडले आहेत. विशेष म्हणजे, हे उखडलेले पेव्हर ब्लाॅक अपघातांनाही कारणीभूत ठरत अाहेत.

दुरुस्ती कामे म्हणजे राेगापेक्षा इलाज भयंकर
शहरातील प्रमुख मार्गांसह अन्य रस्त्यांवरही मुसळधार पावसानंतर खड्डे पडले हाेते. अनेक रस्त्यांची चाळण झाली हाेती. यानंतर पालिका प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपातील कामांतर्गत या रस्त्यांची डागडुजी करून काही ठिकाणी मुरूम टाकून खड्डे बुजवले. मात्र, हे काम पाऊस पडला नसतानाही अल्पावधीतच निकृष्ट असल्याचे दिसून अाले अन‌् सुविधा हाेण्यापेक्षा अपघातांचेच प्रमाण अधिक वाढले असल्याने राेगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती बघावयास मिळत अाहे.

कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्हच...
रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांच्या तक्रारींत वाढ झाली अाहे. महापालिका प्रशासनाकडून अशा रस्त्यांच्या डागडुजीवर भर दिला गेला. आॅगस्टनंतर शहरात त्या प्रमाणात पुन्हा जोरदार पुन्हा पाऊस झाला नाही. अशा परिस्थितीतही महापालिकेला अल्पावधीतच या दुरुस्ती कामांची पुनरावृत्ती करावी लागत असल्याने कामांच्या दर्जाबाबत अाता प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे.

अपघात वाढले...
^खड्डे दुरुस्ती करताना टाकण्यात आलेला मुरूम काही दिवसांतच पुन्हा रस्त्यावर पसरला आहे. यामुळे वाहने घसरून अपघातांचे प्रमाण वाढले अाहे. तात्पुरते काम करण्यात आले असले तरी ते याेग्य पद्धतीनेच व्हायला हवे. महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अाहे. -सचिन कर्डिले, वाहनधारक
प्रशासनाचे कामांचा दर्जा याेग्य राखण्याकडे दुर्लक्ष
गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जवळपास सर्वच भागांत रस्त्यांची चाळण झाली होती. पालिका प्रशासनाने या रस्त्यांच्या तात्पुरत्या स्वरूपातील अस्तरीकरणाचे, तसेच खड्डे बुजविण्याचे काम केले खरे. मात्र, अनेक ठिकाणी या तात्पुरत्या स्वरूपातील कामांचा दर्जाही याेग्य राखला गेल्याने ‘राेगापेक्षा इलाज भयंकर’ अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी बघावयास मिळत अाहे. विशेष म्हणजे, महिनाभरात जाेरदार पाऊस हाेऊनदेखील केवळ रस्त्यांच्या नादुरुस्तीमुळे वाहने घसरणे, पंक्चर हाेणे, अपघात हाेणे यांसारख्या तक्रारींत वाढ हाेऊ लागली अाहे. दाेन ते तीन दिवसांत कामांचे पितळ उघडे पडणे इतकेही ते तात्पुरत्या स्वरूपातील नसावे, याचा पालिका प्रशासनाने विचार करणे गरजेचे बनले अाहे. त्यावर ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझाेत...
{ शहरातील रस्त्यांची चाळण झाली अाहे. अाताच दुरुस्त केलेल्या या रस्त्यांची लगेचच चाळण कशी काय झाली?
-वाहनधारकांच्या तक्रारींवरून रस्त्यावर पडलेले खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवले हाेते. हे काम तात्पुरत्या स्वरूपातच केले जाते.
{तात्पुरत्या दुरुस्तीअंतर्गत केलेली कामे याेग्य दर्जाची झाल्याने अनेक ठिकाणी वाहने घसरणे, अपघात हाेण्याचे प्रकार वाढले अाहेत, त्याचे काय?
-पावसामुळे कदाचित काही रस्त्यांची पुन्हा चाळण झाली असावी, अाम्ही सर्व खड्डे याेग्य पद्धतीने बुजवले अाहेत.
{खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेला मुरूम रस्त्यावर पसरला अाहे. जाे वाहनधारकांसाठी धाेकादायक ठरत अाहे, त्याचे काय?
-ज्या ठिकाणी रस्त्यावर मुरूम पसरलेला असेल, त्या ठिकाणी तातडीने स्वच्छता करून पुन्हा दुरुस्ती करण्यात येईल. जेणेकरून वाहनांना अपघात हाेणार नाही.
बातम्या आणखी आहेत...