आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यवधींच्या रस्त्यांवर पडतोय पालिकेचा हातोडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरात विविध ठिकाणी इंटिग्रेटेड रोड डेव्हलपमेंट प्लॅनअंतर्गत (आयआरडीपी) कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांची कामे सुरू असली तरी तयार झालेल्या रस्त्यांची तोडफोड करून नागरिकांच्या कररूपी महसुलावरच हातोडा पडत असल्याचे चित्र आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून दर पावसाळ्यात नाशिककरांना खड्डय़ांमधून मार्ग काढत प्रवास करावा लागत असल्याने यंदा पावसाळ्याच्या तोंडावरच महापालिकेने रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. ती पूर्ण झाली, तर नागरिकांना या पावसाळ्यात त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. या रस्त्यांचा दर्जा चांगला राखण्याचे आदेश बांधकाम विभागाने दिले असले तरी विविध कारणांसह अगदी वैयक्तिक कारणांसाठीही रस्ते फोडले जात असून, त्याकडे महापालिकेचे साफ दुर्लक्ष होत आहे. अनेक ठिकाणी तयार झालेल्या रस्त्यांच्या दुतर्फा खड्डे खणले जात आहेत, तर काही ठिकाणी चार्‍या खणल्या आहेत.

रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी त्या रस्त्याखालून कोणकोणत्या लाइन जाणार आहेत, यासह भविष्यातील अन्य कामांचे नियोजन केले जाते. मात्र, सध्या होत असलेल्या कामांबाबत मात्र या गोष्टीची अजिबात काळजी घेतलेली नाही.
भद्रकालीत रोज अपघात
भद्रकाली परिसरात ड्रेनेज वाहिनी टाकण्यासाठी रस्त्यावर केलेले खड्डे तसेच सोडून दिल्यामुळे परिसरात रोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. दूधबाजार ते भद्रकाली भाजी मार्केट रस्त्यावर ड्रेनेज पाइप टाकण्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. याठिकाणी पाइप तसेच पडून असल्याने त्यांचा व्यावसायिकांना मोठा त्रास होत आहे. दूध बाजारात नेहमीच वर्दळ असते. सारडा सर्कल ते दूधबाजार हा रस्ता रुंदीकरण कामामुळे बंद केल्याने शालिमार, मेनरोड व बडी दर्गाकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर होतो. त्यामुळे या मार्गावर नेहमीपेक्षा मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते.