आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप-लेकाकडून चोरीच्या ११ अॅक्टिव्हा जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातूनदुचाकी चोरी करून त्या परजिल्ह्यात विकणाऱ्या बाप-लेकाकडून आणखी तीन अॅक्टिव्हा जप्त करण्यात आल्या. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने जुने नाशिक भागातून त्यांना जेरबंद करत चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या होत्या. गाड्या खरेदी करणाऱ्या गॅरेज मालकासही अटक करण्यात आली.

पथकास मिळालेल्या माहितीनुसार चौकमंडईतील संशयित जाकीर शेख त्याचा मुलगा फिरोज शेख हे दोघे अॅक्टिवा विकत असल्याची माहिती मिळाली होती. पथकातील कर्मचारी बनावट ग्राहक म्हणून गेले. अॅक्टिवाची किंमत १५ हजार सांगण्यात आली. संशय बळावल्याने पथकाने दोघांना ताब्यात घेतले. चौैकशीत शहरातील चोरी केलेल्या आठ अॅक्टिवा वैजापूर येथील गॅरेजचालक फिरोज शेख याच्यामार्फत विकत असल्याचे माहिती मिळाली. पथकाने दोघांना अटक केली. दुसऱ्या पथकाने वैजापूर येथून फिरोजला अटक केली. अधिक चौकशीमध्ये वैजापूर येथे आणखी तीन अॅक्टिव्हा हस्तगत केल्या. सहायक आयुक्त सचिन गोरे सहायक निरीक्षक रवींद्र साळुंके, दादा गांगुर्डे, राजेंद्र निकम, रवींद्र पिंगळे, संजय ताजणे, देवकिसन गायकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. अाडगाव, पंचवटी, सरकारवाडा, पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अॅक्टिवा चोरी झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. संशयितांकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.