आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोड्या करणारी टोळी जेरबंद

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी - पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गस्तीदरम्यान घरफोडे आणि पाण्याचे मीटर चोरणार्‍या टोळ्या जेरबंद करण्यात यश आले आहे. त्यांचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
शहरासह पंचवटी परिसरात निवडणूक संपताच घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्या नियंत्रित करण्यासाठी शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले. पंचवटी गुन्हे शोध पथकाचे हवालदार उमेश डहाळे, येवाजी महाले, विजय वरंदळ, राजेश लोखंडे, विजय गवांदे, राजू राऊत, राजू निकम शनिवारी रात्री पेठरोड भागात गस्त घालत असताना रोहिणी हॉटेल परिसरात संजय गोटीराम गांगुर्डे, मंगेश रामदास शिंदे व दिलीप मनोहर धुळे (सर्व रा. रोहिणी झोपडपट्टी, पेठरोड) गॅस सिलिंडर घेऊन जाताना दिसले. पथकाने हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिघांनाही तातडीने पकडले. त्यांच्याकडून चार सिलिंडर हस्तगत करण्यात आले आहेत. ही टोळी गेल्या काही दिवसांपासून कार्यरत होती. त्यांच्याकडून घरफोडीचे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या कामगिरीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.