आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केटरिंग व्यावसायिक दराेडेखाेरांचा म्हाेरक्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दरोड्याच्या तयारीतील मुंबई येथील टोळीतील तिघांना जेरबंद करण्यास भद्रकाली पोलिसांना यश आले. सोमवारी मध्यरात्री खडकाळी परिसरात गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. टोळीकडून प्राणघातक हत्यारे जप्त करण्यात आली. शहरात केटरिंगचा व्यवसाय करणाराच या टोळीचा म्हाेरक्या निघाला. या टाेळीतील दाेन संशयित फरार अाहेत. दरम्यान, या टाेळीतील सदस्य मूळचे उत्तर प्रदेशातील असल्याचे स्पष्ट झाले अाहे.
पोलिसांची माहिती हवालदार उत्तम सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शहरात उत्तर प्रदेशातील घरफाेड्यांची टोळी असल्याची माहिती मिळाली होती. या अाधारे शहरात एका नामांकित नावाने केटरिंगचा व्यवसाय करणारा हजीबुद्दीन इक्बाल खान (रा. खडकाळी, मूळ रा. उत्तर प्रदेश) या संशयितावर पाळत ठेवून अटक करण्यात अाली. संशयित केटरिंग कामासाठी मुंबई येथून परिचयाचे मुले कामास ठेवत होता. काम झाल्यानंतर शहरात व्यावसायिक गाळे, एटीएम फोडून पोबारा करत असल्याची माहिती संशयिताने पथकाला दिली. पथकाने संशयित हसलाम खान ऊर्फ जुमई खान (रा. मुंब्रा), जाब खान (रा. गोवंडी) यांना अटक केली. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ निरीक्षक तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

केटरिंगच्या कामाच्या ठिकाणी केली जाई रेकी
शहरातील विविध भागात केटरिंगचे काम करत असताना संशयित परिसरातील व्यावसायिक गाळ्यांची रेकी करत होते. केटरिंगचे काम संपल्यानंतर काही दिवसांनी या ठिकाणी घरफोडी करत असावे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टाेळी उत्तर प्रदेशातील
^शहरात उत्तर प्रदेशातील एक टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. संशयितावर पाळत ठेवली. आठ दिवसांपासून संशयिताच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जात होते. संशयिताच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्यास ताब्यात घेतले. घरफोडी करणारी टोळी उघडकीस येणार आहे. -सोमनाथ तांबे, वरिष्ठ निरीक्षक, भद्रकाली पोलिस ठाणे
बातम्या आणखी आहेत...