आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पाेलिसमित्र’च्या चपळाईने पुणे येथील कुख्यात दराेडेखाेर जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात तीन ठिकाणी दरोडा टाकून पळणाऱ्या कुख्यात टाेळीच्या म्हाेरक्याला ‘पोलिसमित्र’ प्रशांत खांडरे यांनी उपनगर पोलिसांच्या मदतीने सिनेस्टाइल पाठलाग करून पकडले. शनिवारी (दि. ११) मध्यरात्री बोधलेनगर येथे हा थरारक प्रकार घडला. पुणे येथील या टोळीचे चार सदस्य मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळाले. त्यांच्या मागावर एक पथक पुण्याकडे पाठविण्यात आले आहे.
पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, जुनी आरटीओ कॉलनीतील भक्तिदर्शन अपार्टमेंटमध्ये चोर घुसल्याची माहिती मिळाल्याने गस्तीवरील पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कंपाउंडवरून उडी मारून पळणाऱ्या चोरांपैकी एकाचा पोलिसमित्र खांडरे यांनी पाठलाग केला. जिवाची पर्वा करता त्याला पकडून ठेवले. पाठीमागून आलेल्या पाेलिस पथकाने झडप टाकून त्याला ताब्यात घेत अटक केली. अंगझडतीमध्ये त्याच्याकडे कुकरी दरोडा टाकण्याचे साहित्य सापडले. तसेच, त्यांची स्विफ्ट कार (एम.एच. १२, के.टी. २५०१) ताब्यात घेतली. पाेलिसांनी केलेल्या चाैकशीमध्ये गाेगलसिंग बादलसिंग कल्याणी (रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) असे नाव त्याने सांगितले.

पाेलिसांच्या दुसऱ्या पथकाने पळून गेलेल्यांचा पाठलाग सुरू केला. चंपानगरी, आम्रपाली झोपडपट्टी, नारायणबापूनगर, गंधर्वनगरी, पुणेरोड, शिंदे-पळसे, नांदूर नाका या भागांत त्यांचा शोध घेतला, मात्र अंधाराचा फायदा घेऊन संशयित फरार झाले. पकडले जाण्यापूर्वी त्यांनी जवळच्या विद्यांचल सोसायटीतील मोहनसिंग परदेशी यांचे घर फोडले.

परदेशी यांच्या फिर्यादीनुसार, उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. पाेलिस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, सचिन सदाफुले, पोलिसमित्र प्रशांत खांडरे यांच्यासह गुुन्हे शोध पथकातील सुनील कोकाटे कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

बलदंड दराेडेखाेरास पकडण्याची कामगिरी
पोलिसमित्र प्रशांत खांडरे दिसायला किरकाेळ; पण धिप्पाड, ताकदवान अशा दरोडेखोराला पकडण्याचा पराक्रम त्याने केला. प्रशांत म्हणताे, ‘काहीही झाले तरी दराेडेखाेराला पकडायचे हेच माझे लक्ष्य होते. त्याच्याकडे शस्त्र आहे का, याचीही माहिती नव्हती. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पिस्तूलसारखी वस्तू काढली. प्रतिकारासाठी मीही कमरेला हत्यार असल्याचे भासवले. मी त्याच्यावर झडप घालताच पोलिसही तेथे पाेहाेचल्याने काम साेपे झाले.’ पोलिसमित्र म्हणून यापुढेही समाजसेवा करण्याचा मानस प्रशांतने व्यक्त केला.

देहू येथून स्विफ्ट कारची चोरी
याटोळीने नाशिकला येण्यासाठी देहू (पुणे) येथून स्विफ्ट कार चोरल्याची कबुली पकडलेल्या संशयिताने दिली. पाेलिसांना या कारच्या डिकीमध्ये कटर, कुकरी, चाकू, स्क्रू ड्रायव्हर अादी दरोडा टाकण्याचे साहित्य आणि वाहनांच्या नंबरप्लेट सापडल्या.

सिकलगार टाेळीची दहशत
पुणे, हडपसर परिसरात सिकलगार टोळीची दहशत असून, ही टोळी जवळील शहरात रात्रीच्या वेळी दरोडा टाकून पहाटेच पुण्याकडे पळून जाते. अशा टाेळीतील एक चाेर नागरिकांची जागरूकता, पोलिसांची समयसूचकता पोलिसमित्रच्या धैर्यामुळे जेरबंद झाला. संपूर्ण टाेळी लवकरच जेरबंद करू, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मोठी टोळी उघडकीस
^पुणे येथील कुख्यात टोळीचा म्हाेरक्या जेरबंद झाला आहे. इतर चार सदस्यांची नावे समजली आहेत. दोन पथके त्यांच्या मागावर पाठविण्यात आली आहेत. लवकरच ही टोळी जेरबंद केली जाईल. - अशोक भगत, वरिष्ठनिरीक्षक, उपनगर पोलिस ठाणे
बातम्या आणखी आहेत...