आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूररोडवर भरदिवसा साडेचार लाखांची लूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बँकेतून रोकड काढून पायी जाणा-या व्यावसायिकाच्या हातातील बॅग हिसकावत साडे चार लाखांची रोकड लुटल्याचा प्रकार बुधवारी (दि. ८) दुपारी दीड वाजता गंगापूररोड परिसरातील थत्तेनगर एचडीएफसी बँकेजवळ घडला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रमोद माधव देवगिरे (रा. पंडित कॉलनी) हे दुपारी बँकेतून काढलेल्या रोकडीची बॅग काखेत घेऊन जात असताना काळ्या दुचाकीहून आलेल्या दोघांनी झटापट करून बॅग हिसकावली. यावेळी भीतीने त्यांना आरडाओरडही करता आली नाही. गंगापूर पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस उशिरा घटनास्थळी पोहोचले. मात्र, लूटप्रकरणी वरिष्ठ निरीक्षकांसह सहायक पोलिस आयुक्तांना माहिती नव्हती हे विशेष. यापूर्वी थत्तेनगर परिसरात लुटमारीच्या घटना घडल्या असून, गस्त ठेवण्याचे आश्वासन पोलिस अधिका-यांनी दिल्याचा विसरही वरिष्ठांना पडला असल्याचे नागरिकांनी सांगितले.

सीसीटीव्ही कॅमे-याचा पोलिसांनाच विसर
लुटमारीच्यावाढत्या घटना रोखण्यासाठी परिसरातील बँक व्यवस्थापनाशी पोलिस अधिका-यांनी बैठक घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, हे आदेश कागदोपत्रीच असल्याचे लुटमारीच्या वाढत्या घटनांनी स्पष्ट झाले.

थत्तेनगर परिसरातील लुटीची दहावी घटना
थत्तेनगरपरिसरात लुटमारीची ही दहावी घटना असल्याचे नागरिकांनी सांगितले. एकही गुन्ह्याचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

वरिष्ठांकडूनअसहकार
गुन्हेरोखण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केली जाते. मात्र, वरिष्ठ अधिकारी मिश्कील उत्तरे देत ज्येेष्ठांची बोळवण करत असल्याचेही ज्येष्ठांनी सांगितले.