आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात 19 लाखांची चोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - व्दारका परिसरातील पाटीदार भवनजवळील राधाकुंज सोसायटीतील फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी सायंकाळी सुमारे 18 लाख 90 हजारांचा ऐवज चोरून नेला. यात दीड लाखाच्या रोकडसह, बारा सोन्याच्या बांगड्या, हिरे व इतर मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे. सायंकाळी 5 ते 5.30 च्या सुमारास फ्लॅटच्या मालक वंदना सेन या घरी नसताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सेन यांचा मुलगा अमेरिकेत नोकरीला असून त्या येथील घरी एकट्याच असतात.