आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शोरूममधून सात लाखाचे लॅपटॉप लंपास; महिनाभरातील दुसरी घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी: कॅनडा कॉर्नरवरील डेल कंपनीचे शोरूम शुक्रवारी पहाटेच्या सुमारास फोडून चोरट्यांनी सुमारे सात लाख रुपये किमतीचे एकूण 12 लॅपटॉप लंपास केले. पोलिस मुख्यालयापासून थोड्याच अंतरावरील याच शोरूममध्ये महिनाभरात दुसर्‍यांदा बरोबर एक तारखेलाच लॅपटॉप चोरीस गेले आहेत. पहिल्या घटनेचा तपास लागत नाही तोच दुसरी चोरी झाल्याने सरकारवाडा पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
कॉलेजरोडवरील कॅनडा कॉर्नर परिसरात डेल कंपनीचे लॅपटॉप विक्री आणि दुरुस्तीचे शोरूम आहे. दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून डेल कंपनीचे 12 लॅपटॉप चोरी केले. व्यवस्थापक राजेंद्र मराठे शोरूमजवळ आले असता त्यांना शटर वाकलेले दिसले. शोरूममधील डिस्प्लेमध्ये ठेवलेले 12 लॅपटॉपचे लॉकदेखील तुटलेले होते. 1 जूनला एका महिलेने दुकानातून लॅपटॉप चोरी केले होता. तो गुन्हा उघडकीस आणण्यात सरकारवाडा पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. पुन्हा 1 मे रोजी सात लाख रुपये किमतीचे 12 लॅपटॉप चोरीस गेले आहेत. पोलिस उपआयुक्त साहेबराव पाटील, सहआयुक्त गणेश शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, मराठे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. निरीक्षक मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.