आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गंगापूररोडवरील बंगल्यात महिलेला बांधून लुटले दोन लाख रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरात सुरू झालेले घरफोडी-लुटमारीचे सत्र रोखण्यासाठी पोलिस कोम्बिंग ऑपरेशन राबवत असतानाच गंगापूररोडवरील बंगल्यात महिलेस बांधून ठेवत दोन लाखांचा ऐवज लुटण्यात आला.

स्वामी सर्मथ चौक परिसरात भारती शशिकांत तारगे यांचा यश हा बंगला असून, गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास त्या टीव्ही पाहत असताना दोघांनी बेल वाजवून घरात प्रवेश केला. तारगे यांना पत्ता विचारतानाच त्यांनी पिण्यासाठी पाणीही मागितले. त्या पाणी आणण्यासाठी आतील खोलीत जाताच त्यांच्या मागोमाग जात चाकूचा धाक दाखवत खुर्चीला बांधून ठेवले व अंगावरील दागिने हिसकावून घेतले. नंतर दमदाटी करून कपाटाची चावी मिळवत दागिने, रोख रक्कम ताब्यात घेत ते पसार झाले. घरात अन्य कोणी नसल्याने चोरांचे काम सोपे झाले. ही घटना गंगापूर पोलिसांना कळताच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी दाखल झाले; मात्र लगेच कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत.