आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरदिवसा रस्त्यात लुटले कामगाराचे तीन लाख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लुटीच्यादाेन घटना ताज्या असतानाच गुरुवारी खडकाळी सिग्नल परिसरात एका कामगाराची तीन लाखांची रक्कम लुटण्यात आली.

अमराराम तुलसीराम नेन (रा. त्रिकोणी बंगला, काठेगल्ली) हा कामगार दुपारी बाराच्या सुमारास अॅक्सिस बँकेतून तीन लाखांची रक्कम पिशवीत ठेवून शालिमारवरून रिक्षा पकडण्यासाठी खडकाळी सिग्नलच्या दिशेने पायी जात असताना, पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी झटापट करून पिशवी लांबवली. अवघ्या पाच िमनिटांत ही लूट करण्यात अाली. अाधीच्या दाेन घटनांप्रमाणेच या प्रकारातही संशयितांनी बँकेतच पाळत ठेवल्याचा अंदाज अाहे.
सोमवार, बुधवार आणि गुरुवार या तीन दिवसांत झालेल्या नऊ लाखांच्या लुटीत संशयितांनी एकच पद्धत वापरली असल्याचेही पोलिसांच्या तपासात उघडकीस आले अाहे. मात्र, अशा प्रकारचे गुन्हे घडू नये, यासाठी ठोस उपाययोजना आखल्या जात नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, उपआयुक्त अविनाश बारगळ, सहायक आयुक्त रवींद्र वाडेकर, मधुकर कड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. मात्र, धागेदाेरे मिळाले नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित कैद झाले आहेत. मात्र, चित्रीकरण स्पष्ट नसल्याने फारशी माहिती हाती लागली नाही.
सोमवार. ठिकाणराजीव गांधी भवन. ठेकेदार मनोज वाडेकर यांची कार्यालयाच्या आवारातच तीन लाखांची रक्कम लुटली.

बुधवार.ठिकाणबाॅइज टाऊन रस्ता. मकरंद जाधव यांचा पाठलाग करत पत्नीच्या हातातील तीन लाख असलेली पर्स लांबवली.

गुरुवार.ठिकाणखडकाळी सिग्नल. पायी जाणाऱ्या नेन यांच्या हातातील पिशवी लांबवत तीन लाखांची लूट.
संशयितांना घेणार लवकरच ताब्यात
तिन्हीिठकाणची लूट एकाच टाेळीतील संशयितांनी केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. सीसीटीव्ही िचत्रीकरणात काही माहिती हाती आली आहे. लवकरच या गुन्ह्यांचा तपास लागेल. पाेलिस सर्व ते प्रयत्न करतील. संदीपदिवाण, उपायुक्त