आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Robbery Issue At Suchitanagar, Nashik, Divya Marathi

सुचितानगरात पाच लाखांची घरफोडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महामार्गालगतच्या हॉटेल रसोईमागील सुचितानगर येथे ज्येष्ठ नागरिक प्रफुल्ल भानुशाली यांच्या बंद घराच्या खिडकीचे ग्रील तोडून चोरट्यांनी सुमारे पाच लाखांचा ऐवज लांबविला. इंदिरानगर पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात गुरुवारी सकाळी 8 वाजता घडलेल्या घटनेची पोलिसांनी तब्बल 12 तासांनंतर दखल घेतल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

‘साईतीर्थ’ बंगल्यात सेवानिवृत्त अधिकारी भानुशाली राहतात. गेल्या आठवड्यापासून ते विदेशात नातेवाइकांकडे गेले आहेत. गुरुवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणार्‍यांना स्वयंपाकगृहाच्या खिडकीचे ग्रील तोडल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी भानुशाली यांचा मुलगा संदेश भानुशाली (रा. गोविंदनगर) यांना हा प्रकार कळविला. दरम्यान, संदेश यांनी घराचा दरवाजा उघडून बघितले असता तळमजल्यावरील तीन आणि वरच्या मजल्यावरील तीन अशा सहा बेडरूममधील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले, तर प्रत्येक खोलीतील कपाट फोडून सोने, चांदीचे दागिने लांबविल्याचा प्रकार उघड झाला.
वरिष्ठांकडे तक्रार केल्यावर दखल : फिर्यादीने इंदिरानगर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर दिवसभर कोणीही फिरकले नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधल्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, श्वानपथकास पाचारण न केल्याने पोलिसांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.