आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इगतपुरीत थरार, दरोडेखोरांनी लुटले साठ किलाेे साेने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी/ नाशिक - ‘झी गाेल्ड’या कंपनीकडून धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील रिफायनरीत शुद्धीकरणासाठी पाठविण्यात येत असलेले ६० किलाे साेने मुंबई-अाग्रा महामार्गावर वाडीवऱ्हे येथे रिव्हाॅल्व्हरचा धाक दाखवून लुटण्यात अाले. चित्रपटांमधून साेन्याची बिस्किटे ठेवलेेले वाहन लुटले जाण्याची घटना प्रत्यक्षात घडावी, त्याच स्टाइलने हा प्रकार घडला.

पाेलिसांच्या गाडीप्रमाणेच लाेगान कारवर अंबर दिवा लावून त्यातून अालेल्या पाच जणांनी तब्बल १६ काेटी २३ लाख रुपयांचे हे साेने लांबविले. शुक्रवारी (दि.२४) पहाटे ३ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा रोडवर रायगडनगर वाडीवऱ्हे शिवारात हा धाडसी प्रकार घडला. नाशिक जिल्ह्यात घडलेली अशा स्वरूपाची ही पहिलीच घटना अाहे.

अशी घडली घटना
हे साेने शिरपूर रिफायनरीत सुरक्षितपणे पाेहाेचविण्याची जबाबदारी अंधेरीतील ‘सिक्वेल (सिक्युअर्ड लॉजिस्टिक सर्व्हिसेस) या कंपनीवर साेपविण्यात अाली हाेती. त्यांनी ते सुपरवायझर, चालक अाणि दाेन सुरक्षा रक्षक अशा चार जणांसह एका वाहनातून (एमएच ०२ सीई ४०१०) रवाना केले. रात्री पावणेअकराच्या सुमारास ते कसारा येथे चहापान करण्यासाठी थांबले. तेथून निघाल्यानंतर रात्री २ च्या सुमारास ते लतिफवाडी येथे दुसऱ्यांदा चहासाठी थांबले. तेथून निघाल्यानंतर वाडीवऱ्हे येथे ते पाेहाेचले. त्याचवेळी पाेलिसांच्या वाहनासारखा अंबर दिवा असलेल्या लाेगान गाडीतून या वाहनाचा सायरन वाजवित पाठलाग सुरू करण्यात अाला. रात्री गस्त घालणाऱ्या पाेलिसांची ती गाडी असेल, असे समजून चालकाने वाहनाचा वेग कमी केला. मात्र, त्या गाडीतील चालकाने साेने असलेले वाहन रस्त्यावर अाडवी गाडी उभी करून राेखले. त्यातून उतलेल्या दाेघांनी रिव्हाॅल्व्हरचा धाक दाखवून चालक प्रवीण दुबे व सुपरवायझर समीर पिंजारी यांना राेखले. या दाेघांसह एका सुरक्षा रक्षकास मारहाण करून त्यांचे हातपाय बांधून समाेरच असलेल्या वाहनाच्या गुदामामध्ये कोंबले. उर्वरित तिघांनी त्यांच्याकडून पेट्यांच्या चाव्या काढून घेत प्रत्येकी एक किलाेची ६० बिस्किटे लांबविली. घाई गडबडीत एक मात्र गाडीतच राहिले.

चालक जावेद अहमद याच्या खिशातील दोन मोबाइल दराेडेखाेरांनी नेले. मात्र, पिंजारी यांच्या खिशातील मोबाइल त्यांनी नेला नाही. हे पाचही जण पसार हाेताच अहमद व पिंजारी यांनी सुटका करून घेत पाेलिसांशी शंभर क्रमांकावर संपर्क साधला. नाशिक शहर नियंत्रण कक्षास माहिती मिळताच त्यांनी ग्रामीण पोलिसांना सूचना दिली. काही वेळातच वाडीवऱ्हे पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. दुपारी उशिरा वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक एन. एन. पाटील तपास करत आहेत. हे पाचही संशयित हिंदी मिश्रित मराठीत बाेलत असल्याचे साेने नेणाऱ्या चाैघांनी दिलेल्या प्राथमिक जबाबात म्हटले अाहे. दरोड्याचा प्रकार पहाटे घडूनही स्थानिक पोलिसांकडून त्याबाबत कमालीची गोपनीयता पाळली गेली. पोलिस उपाधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहने पोलिस ठाण्यात पाेहाेचल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.

पूर्वनियाेजित असल्याचा संशय
ही लूट पूर्वनियाेजित असल्याचा संशय व्यक्त केला जात अाहे. कारण जे वाहन लुटण्यात अाले. त्याबराेबर दाेन सशस्त्र सुरक्षा रक्षक हाेते. त्यांनी व चालक, सुपरवायझर यांनी काहीही प्रतिकार का केला नाही? लुटारूंनी काेणालाही गंभीर स्वरूपाची मारहाणदेखील केलेली नाही? इतके सोने असूनही रात्री वाहतूक का केली? महामार्गावर ट्रक चालकांसाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहासमोर हा प्रकार घडला. येथे वर्दळ असते. मग या मदतीसाठी अारडाअाेरड का केली नाही? घटनास्थळ वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यापासून दीड किलाेमीटरवर आहे. तरीदेखील हा सर्व प्रकार कुणाच्या लक्षात का आला नाही? हे प्रश्न संशय निर्माण करणारे आहेत.

सीसीटीव्ही, जीपीएस बंद
सोन्याची वाहतूक जोखमीचे काम असल्याने अशी वाहतूक करणाऱ्या या वाहनाला चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात अालेले असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास अाले. मात्र, त्यापैकी एकही कॅमेरा कार्यान्वित नव्हता. तसेच वाहनातील जीपीएस यंत्रणादेखील कार्यरत हाेती किंवा नाही, याबाबत तपास यंत्रणेला संशय अाहे. तरीही पोलिसांनी कॅमेऱ्यांमध्ये असलेले आठ दिवसांपूर्वीचे चित्रीकरण तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यातून काही धागेदोरे मिळतील, अशी आशा आहे.

लतिफवाडीपासून माग
सोने घेऊन जाणारे पथक लतिफवाडी येथे रात्री २ वाजेच्या सुमारास दुसऱ्यांदा चहापाणी घेण्यासाठी थांबले होते. येथूनच संशयितांनी त्यांचा पाठलाग सुरू केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

सीसीटीव्हीत कैद?
टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अंबर दिवा नसलेले एक संशयित वाहन िदसत असून, त्यांनी नाका साेडल्यानंतर वाहनावर अंबर िदवा लावला असावा, असाही कयास अाहे.

सायरन वाजवत दरोडा
टोल पोलिस वापरतात त्या लोगन गाडीतून सायरन वाजवत दरोडेखोरांनी सोन्याची वाहतूक करणाऱ्या गाडीचा पाठलाग केला. पोलिसांचे गस्ती पथक असावे, असे वाटून चालकाने वेग कमी करताच रस्त्यात लोगन आडवी लावून ही लूट करण्यात आली.

मोठ्या चोऱ्या
- नाशिकराेडला ‘मणप्पुरम गोल्ड लोन’ मधून १५ किलो सोने लुटले होते. मुंबईतील टोळीचा लागला माग.
- महात्मानगरला ‘तनिष्क’ शाेरूममधून झाली दागिने चाेरी. ५ दिवसांत एका महिला कर्मचाऱ्यासह प्रियकरास अटक.
पुढील स्लाइडवर पाहा, कसे घडले नाट्य...