आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेच्या गळ्यातील साेनसाखळी लांबविली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर- वनविहार काॅलनी येथे राहणाऱ्या सुरेखा भीमाशंकर जाेशी या शेजारील महिलांसाेबत गुरुवारी माघी गणेश जयंतीनिमित्त महात्मानगर येथील गणेश मंदिरात गेल्या हाेत्या. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्या वनविहार काॅलनी येथील अाैद्याेगिक वसाहतीतील हनुमान मंदिराजवळील रस्त्याने जात असताना समाेरून अालेल्या माेटारसायकलस्वाराने त्यांच्या गळ्यातील दीड ताेळे वजनाची साेनसाखळी अाेरबाडून नेली.
दोघांवर चाकूचे वार
त्र्यंबकराेडवरीलकुबेरस्वामी पेट्राेलपंपावर शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता, कमी वेळेत पेट्रोल टाकून गाडीवर का सांडवले, अशी कुरापत काढून दोन जणांंनी पंपावरील कर्मचारी संदीप पवार यास शिवीगाळ करून मारहाण केली. कर्मचारी देवीदास निंबेकर याने भांडण साेडविण्यास पुढाकार घेताच दाेन्ही संशयितांनी निंबेकर यांच्या डाेक्यावर पाेटावर चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाेलिसांनी दाेन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून, ते अकरावीत शिकतात. पाेलिस उपनिरीक्षक मनीष पाेटे या प्रकरणाचा तपास करीत अाहेत.