आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकराेडला चाॅपरने वार करून लुटले, दाेन घटनांमध्ये दाेन गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तिघांनी रस्त्याने पायी जाणाऱ्या दोघांवर चाॅपरने वार करीत गंभीर जखमी करीत त्यांच्याकडील रकमेसह हजारो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उपनगर आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडली आहे. दोन्ही पोलिस ठाण्यात तीन अज्ञात युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


शुक्रवारी (दि. २४) रात्री १२.३० वाजेच्या सुमारास उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रवींद्र दत्तात्रय रानडे (वय ५५, रा. यशाेधाम अपार्टमेंट, गंधर्वनगरी) हे पायी घरी जात असताना मोटवाणी रोडवर पाठीमागून दुचाकीवर अज्ञात तीन युवक आले. त्यांनी रानडेंकडे तंबाखूची मागणी केली. तंबाखू नसल्याचे सांगताच एकाने रानडे यांच्यावर चाॅपरने हल्ला करीत जबर जखमी केले. त्यांच्या खिशातील तीनशे रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला. जखमी रानडे यांना तत्काळ बिटको रुग्णालयात दाखल करण्यात अाले. दरम्यान, ही घटना उपनगर पोलिसांना तत्काळ कळवली असता पोलिस वेळेवर पाेहाेचल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 


दुसरी घटना नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. राकेश ज्ञानेश्वर कुमावत ( १९, रा. तामसवाडी, तरोळा, हल्ली मु. पंपिंग रोड, श्रीकृष्ण काॅलनी ) हा सातपूर येथील इप्काॅस कंपनीत कामाला असून, शुक्रवारी रात्रक्ष बारा वाजेच्या सुमारास पायी जात असताना अॅक्टिव्हा दुचाकीवर अज्ञात तीन युवक आले त्यांनी राकेशला थांबविण्याचा प्रयत्न केला. राकेश पळू लागला असता या युवकांनी त्याचा पाठलाग केला आणि ‘तू चोरी करून पळत आहेस’, असे सांगत एकाने राकेशच्या डाेक्यावर चाॅपरने हल्ला करत त्यास गंभीर जखमी केले. त्याच्या गळ्यातील चांदीची चेन, मोबाइल फोन, रोख रक्कम असा सुमारे साडेचार हजार रुपयांचा ऐवज घेऊन ते पसार झाले. राकेशच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिसांनी अज्ञात युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला अाहे. 


रात्री १० वाजेनंतर दुकाने सुरूच 
नाशिकरोडआणि उपनगर ठाण्याचे पोलिस आपल्या हद्दीतील दुकाने न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रोज रात्री १० वाजेनंतर सायरन वाजवत बंद करण्यास सांगतात. मात्र, तरीही मध्यरात्रीपर्यंत दुकाने सुरू राहतात तर काही दुकानांवर टवाळखोरांची गर्दी असते. पोलिसांच्या या गस्तीबाबत नागरिकांमध्ये विविध स्वरूपाची चर्चा सुरू असून पाेलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी आतातरी नागरिकांच्या संरक्षणासाठी सरसावले पाहिजे, असे म्हटले जात अाहे. 

बातम्या आणखी आहेत...