आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाची खिडकी: 'चीरक’ पक्षी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- इंग्रजी लेख आणि साहित्यात, विशेषत: लहान मुलांच्या कवितांमधून नेहमी भेटणार्‍या रॉबिन पक्ष्याचा हा भारतीय भाऊबंद ‘चीरक’ नावाने ओळखला जातो. नराचा रंग तुकतुकीत काळा असून, त्यावर चमकदार निळसर झाक असते. मादीचा रंग मात्र मळकट तपकिरी असतो. दोघांच्या शेपटीखाली तांबूस रंगाचा ठिपका असतो. हे पक्षी वारंवार शेपटी वर-खाली करतात आणि तेव्हा हा ठिपका दृष्टीस पडतो. चिमणीपेक्षा थोडा मोठा असणारा हा पक्षी आपल्या घराभोवती, बागेत, शेतांजवळ, तसंच मोकळ्या माळावर, तारांवर, खांबांवर असा सर्वत्र दिसू शकतो. याच्या चर्र-चर्र, च्रीप-च्रीप अशा आवाजामुळे याचं नाव ‘चीरक’ पडलंय. मात्र, एप्रिल-मे महिन्यात याचा विणीचा हंगाम सुरू झाला की, नर मंजूळ आवाजात शिटी वाजवल्यासारखा गाऊ लागतो. याच काळात मादीभोवती पिंगा घातल्यासारखा नाच करत नर मादीला अन्न भरवताना दिसतो.