आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोबोटिकच्या खरेदीवरून गदारोळ, माजी महापौर आयुक्तांवर आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तीनकाेटींचे राेबोटिक मशीन देखभालीवर काेटींचा खर्च असा महापालिकेचे अार्थिक नुकसान करणारा प्रस्ताव नगरसेवकांचा विराेध असताना मंजूर केल्यानंतर अाता पुन्हा गाेदावरी स्वच्छतेच्या नावाखाली एकाच कामावर दाेन वेगवेगळे खर्च करण्याच्या प्रस्तावावरून महासभेत चांगलाच गदाराेळ झाला. वादग्रस्त राेबाेटिक खरेदीवरून माजी महापाैर खास करून माजी अायुक्त संजय खंदारे यांना लक्ष्य करीत या प्रकरणाची चाैकशीची मागणीही करण्यात अाली. दरम्यान, महापाैर अशाेक मुर्तडक यांनी सविस्तर माहिती घेतल्यावरच चाैकशीचे बघू, असे सांगत प्रस्ताव तहकूब केला.
महापालिका क्षेत्रातील नाले, नदीकाठावरील गाळ काढणे, साफसफाईसाठी राेबाेटिक एक्सकॅव्हेटर मशीन अाॅपरेशन त्याच्या देखभालीसाठी तीन वर्षांसाठी काेटी लाख २० हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव यांत्रिकी विभागाने ठेवला हाेता. हा प्रस्ताव बघून नगरसेवक अवाक् झाले. विक्रांत मते यांनी काेटींच्या मशिनला नगरसेवकांचा विराेध असताना तत्कालीन अायुक्तांनी खरेदी केल्याचा अाराेप केला. तीन काेटींचे मशिन देखभालीसाठी काेटी हे अजब असल्याचे सांगितले. मुळात यंत्र खरेदी करतानाच महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करून हस्तांतरणाची अट हाेती. अशा परिस्थितीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित का केले नाही याची चाैकशी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यापूर्वीच महासभेने नदी-नाल्यातील गाळ काढण्यासाठी एक काेटी खर्चाचा प्रस्ताव मंजूर केला अाहे. मग याच कामासाठी पुन्हा दाेन काेटी खर्चाची गरज काय? असाही प्रश्न केला.
दरमहा लाख रुपये या कामावर खर्चण्याचे कारणच काय? असाही प्रश्न केला. महापाैर अायुक्तांसह नगरसेवकांनी राेबाेटिक मशिन नेमके चालते कसे याचे प्रात्याक्षिक बघूनच खर्चाला मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेना गटनेते अजय बाेरस्ते यांनी ‘चाराण्याची काेंबडी बाराण्याचा मसाला’ अशी गत या प्रस्तावाची असल्याचा टाेला लगावला. तत्कालीन अायुक्तांच्या हव्यासापाेटी पालिकेला भुर्दंड बसला. यांत्रिकी विभागाचे काम संशयास्पद असून, यापूर्वी मेलेल्या जनावरांचे दहन करण्याचे यंत्र खत प्रकल्पात धूळखात पडून असल्याचे सापडले. असे असताना नवीन यंत्र खरेदीचा घाटही उघडकीस अाला हाेता. हा विषय फेटाळून चाैकशी करावी अशीही मागणी केली. उपमहापाैर गुरुमित बग्गा यांनी काेटी लाख रुपयांचा देखभालीसाठी हाेणाऱ्या खर्चाचा तपशील मागितला. ७५ लाख रुपये देखभालीसाठी खर्च काढण्यामागचे गृहितक काय? असा सवाल करीत काेंडीत पकडले.

जुन्या खरेदीला विराेध केला असतानाही माजी अायुक्तांनी अापले घाेडे दामटले. अाता मागील करारनाम्यात काय काय हाेते त्यातील किती बाबींची अंमलबजावणी झाली याचाही शाेध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. उद्धव निमसे यांनी राेबाेटिक मशिन नेमके कसे हेच अनेक नगरसेवकांना माहीत नसल्याचा दावा केला. एप्रिल महिन्यात पाणवेलींसाठी वारंवार मागणी करून मशिन मिळाले नसल्याकडे लक्ष वेधले.

मितभाषी सर्वपक्षीय सलाेखा ठेवणाऱ्या सलीम शेख यांना स्थायी समिती सभापती सभागृहनेतेपद भूषवण्याचा मान मिळाला. मात्र, महापाैरपदाचा लाल दिवा मिळावा ही त्यांची प्रबळ इच्छा अपूर्ण हाेती. शुक्रवारी महासभेत उपमहापाैर भाषणासाठी खाली गेल्यावर महापाैर अशाेक मुर्तडक यांनी एका कामानिमित्त सभागृहाबाहेर जाताना शेख यांची इच्छा हंगामी पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करून पूर्ण केली. महापाैरपदाच्या खुर्चीत बसल्याचा अानंद शेख यांच्या चेहऱ्यावर लपून राहिला नाही.
अार. के. पवार यांचे काय झाले?
दिनकर पाटील यांनी खत प्रकल्पात यापूर्वी धूळखात सडलेल्या काेट्यवधी रुपयांच्या यंत्रसामग्रीप्रकरणी तत्कालीन अायुक्तांनी चाैकशीसाठी पाठवलेला अधीक्षक अभियंता अार. के. पवार यांच्या प्रस्तावाचे काय झाले, असा सवाल केला. अशा प्रकरणातील अधिकाऱ्यांच्या चाैकशीचे जाेपर्यंत काहीच हाेणार नाही ताेपर्यंत अशा खरेदी सुरूच राहतील, असाही अाराेप त्यांनी केला. त्यावर महापाैरांनी चाैकशीची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे सांगत अायुक्तांच्या काेर्टात चेंडू टाेलवला.

नाकापेक्षा माेती जड
शिक्षण समिती सभापती संजय चव्हाण यांनी ‘नाकापेक्षा माेती जड’ अशी प्रस्तावाची गत असल्याकडे लक्ष वेधले. राेबाेटिक खरेदीवरूनच माजी अायुक्त संजय खंदारे यांची बदली झाल्याचा अाराेप केला. नगरसेवकांचा विराेध असताना माजी महापाैर माजी अायुक्तांनी बेकायदेशीर खरेदी केल्याचाही अाराेप केला. खरेदीत अनियमितता असून, माजी अायुक्त, माजी अधीक्षक अभियंत्यांच्या चाैकशीची मागणी केली. यंत्राच्या किमतीपेक्षा देखभालीवर खर्च अधिक असल्याचे सांगत पालिकेची लूट किती करणार? असा सवाल केला.

बातम्या आणखी आहेत...