आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगलीनंतर तणावपूर्ण शांतता; जनजीवन आले पूर्वपदावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक- मुलीची छेड काढल्याच्या प्रकारावरून जुने नाशिकमधील शिवाजी चौकात बुधवारी रात्री दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर परिसरात मोठय़ा प्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, गुरुवारी तणावपूर्ण शांततेत जनजीवन सुरू होते. दंगलीप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

दंगलसदृश परिस्थितीला नियंत्रित करताना एक पोलिस हवालदार जखमी झाला. गुरुवारी पहाटे काही समाजकंटकांनी एका स्विफ्ट गाडीच्या काचा फोडल्या. कुंभारवाडा व नानावली परिसरात घरात घुसून साहित्याची तोडफोड करण्यात आली. यात मारिया मेडिकल व दोन दुचाकी, सुमो, मारुती ओम्नी, स्विफ्ट कार, स्कूटी यांची तोडफोड करण्यात आली. समाजकंटकांनी परिसरातील एका घरातील वस्तू पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांची कुमक वेळीच घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. यामध्ये भगवान कहार, शहेजादा बागवान, अय्युब पठाण, गोविंद कहार, अब्दुल रहेमान शेख, नंदू कहार यांचा समावेश आहे. दरम्यान, गुरुवारी पोलिसांनी परिसरातील नागरिकांशी पुन्हा एकदा चर्चा करून त्यांना शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले. घटनेनंतर परिसरात शांतता आहे.