आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राेजगार फळ्यांच्या माध्यमातून रेखाटणार राेजगाराचे चित्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेतीलसत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बड्या नाेकऱ्यांपासून तर गल्लीबाेळातील किरकाेळ कामाच्या माध्यमातून बेराेजगारांना राेजगार देण्यासाठी शहरात ६०० राेजगार फळे उभारण्याचा निर्णय घेतला अाहे. यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर पाठवला जाणार असून, त्यासाठी स्थायी समिती सभापती सलीम शेख यांनी पुढाकार घेतला अाहे.

भूमिपुत्रांच्या राेजगाराच्या मुद्यावरून पाच वर्षांपूर्वी मनसेचा जयजयकार झाला; मात्र पुढील वाटचालीत हा मुद्दा बाजूला पडला. स्थानिक युवकांना काम देण्यासाठी मनसेने प्लेसमेंट कॅम्प वा करिअर मार्गदर्शन शिबिरासारखे उपक्रम राबवले; मात्र ते ठराविक लाेकांपुरतेच मर्यादित राहिले.

अाता सत्ताकाळाच्या अखेरच्या टप्प्यात राेजगार फळ्याच्या माध्यमातून बेराेजगारांना अापलेसे करण्याचा मनसेचा प्रयत्न अाहे. प्रत्येक प्रभागात पाच-सहा याप्रमाणे १२२ प्रभागात जवळपास ६०० राेजगार फळे उभारण्याचे नियाेजन अाहे. या फळ्यांवर केंद्र, राज्य, तसेच प्रत्येक जिल्ह्यातील राेजगाराविषयीच्या संधीची माहिती दिली जाणार अाहे. एवढेच नव्हे तर, खासगी क्षेत्रातील नाेकऱ्यांचीही माहिती असेल. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी अावश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देण्यासाठी मदत दिली जाणार अाहे. या सर्वांचे नियंत्रण अायअारएलडी फाउंडेशनकडे राहील. संस्थेचे प्रवीण बाेडखे या उपक्रमाचे संकल्पक-संचालक अाहेत.

फळे लिहिण्याची जबाबदारी स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनाच दिली जाणार अाहे. फळे उभारणी अन्य कामासाठी तीन वर्षांची जबाबदारी संबंधित संस्थेवर असणार असून, त्यांना प्रतिफळ्यामागे १७ हजार रुपये देण्याचा विचार अाहे. साधारण दीड काेटी रुपयांचे हे काम असून महासभेच्या मान्यतेनंतर स्थायी समितीकडे निविदा हाेऊन प्रत्यक्ष काम दिले जाणार अाहे.

गेल्या निवडणुकीत शहरातील युवक मतदारांनी राज ठाकरे यांचा करिश्मा अाणि मनसेच्या अाक्रमकपणाकडे अाकर्षित हाेत या पक्षाच्या पदरात घसघशीत दान टाकले हाेते. राेजगार फळ्यांनी तसा परिणाम हाेताे का, ते अाता पाहायचे.


हाॅस्पिटल, हाॅटेलांतील राेजगारही कळणार
बऱ्याच वेळा गल्लीबाेळातच राेजगार उपलब्ध हाेऊ शकताे; मात्र त्याची माहिती तेथील रहिवाशांना कळत नाही. या पार्श्वभूमीवर हाॅटेल, हाॅस्पिटल, दुकाने अशा विविध अास्थापनांतील राेजगाराची माहिती फळ्यावर असेल. जेणेकरून, काम देऊ इच्छिणाऱ्या तसेच काम करणाऱ्या दाेघांचाही फायदा हाेणार अाहे.

मनसे शब्द पाळणार
भूमिपुत्रांनाराेजगारउपलब्ध करून देण्याचा शब्द मनसेने दिला हाेता. राेजगाराच्या सर्व संधींची माहिती देण्यासाठी ६०० राेजगार फळे लावले जाणार अाहेत. लवकरच प्रस्ताव महासभा मंजूर करेल. -सलीम शेख, सभापती, स्थायी समिती
बातम्या आणखी आहेत...