आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हजारोंच्या हाती फुलले गुलाब...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाबाच्या फुलांना असलेल्या मागणीमध्ये दरवर्षी वाढ होताना दिसत आहे. नाशिकमध्ये तर हजारोंच्या संख्येने गुलाबांची, विशेषत: लाल गुलाबांची विक्री होत असून यंदा पॉलिहाऊस गुलाबाची किंमत प्रति गुलाब 20 ते 25 रूपये आणि साध्या गुलाबांची किंमत 10 रूपये आहे.

अतिशय सुंदर आकारात वाढलेली आणि नाजूकशी दिसणारी गुलाबाची फुलं हातात घेताच प्रत्येक प्रेमीजनाचा चेहरा फुलासारखाच खुलतो. त्यामुळेच लाल गुलाबाला विशेष मागणी असते. मात्र, लाल गुलाब न मिळाल्यास काहीशा खट्टूपणे गुलाबी, पिवळा किंवा पांढर्‍या वगैरे गुलाबांची निवड केली जाते. नाशिकमध्ये तर व्हॅलेंटाईन डे च्या आदल्या दिवशीपासूनच मोठय़ा प्रमाणावर गुलाबांची विक्री सुरू होते. काही फुलविक्रेत्यांच्या अनुभवानुसार आदल्या दिवशी सायंकाळच्या सुमारापासून तब्बल 100-100 बंडल देखील विकली जातात.

यंदा पॉलिहाऊसच्या गुलाबाचे बंडल होलसेल रेट मध्ये सुमारे 80 रूपयांना तर साध्या गुलाबाचे बंडल सुमारे 40 रूपयांपर्यंत विकले जात आहे. मात्र, गुलाबाच्या फुलांचे बंडल विकत घेण्यापेक्षा लाल गुलाबांचा हँडबुके, किंवा बोट शेप्ड, स्टँड बुके वगैरे घेण्यास जास्त मागणी असते. दहा लाल गुलाबांच्या बुकेची किंमत 200 रूपयापासून सुरू होतो. जास्त गुलाब वापरून बुके बनवल्या गेल्यास त्याची किंमत थेट 1000-1100 रूपयांपर्यंत असते. त्याचबरोबर ग्राहकांच्या मागणीनुसारही बुके बाजारात उपलब्ध आहेत.

गुलाबाला वाढती मागणी..
कॉलेजरोड व परिसरात व्हॅलेंटाईन डे ला लाल गुलाबांना प्रचंड मागणी असते. सुमारे 2 ते 3 हजार गुच्छांची विक्री होते. पॉलिहाऊसच्या एका गुच्छात वीस तर साध्या गुलाबांच्या गुच्छात 12 गुलाब असतात. नाशिकमध्ये यंदाही अशीच मागणी असेल असे वाटते. तसेच लिलीयम अँन्थोरियमचे एक फूल 30 ते 40 रूपयांना असूनही त्यास मागणी आहे. शिवाय जरबेरा, ग्लॅडियोलस, निशिगंध आहेतच.
-विलास शिंदे, फुलविक्रेते