आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंवर्धन घराघरांपर्यंत पाेहाेचविण्याचा अनाेखा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पाण्याचा सुयाेग्य वापर घराघरांतून हाेण्याची नितांत गरज असून, त्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू अाहेत, सदासर्वदा पाणी संवर्धन करणे मानवासाठी हिताचे असल्याचा संदेश घराघरांपर्यंत पाेहाेचविण्याची गरज अाहे. याबाबत निरागस मुलांना काय वाटते, काय सुरू अाहे त्यांच्या मनात याचाच शाेध घेतला राेटरी क्लबने विशेष चित्रकला स्पर्धा घेऊन. राेटरी हाॅल, गंजमाळ येथे रंगलेल्या या स्पर्धेत शहरातील दीडशेवर शालेय विद्यार्थ्यांनी अापल्या मनातील संकल्पना चित्रस्वरूपात उतरविल्या असून या चित्रांचे प्रदर्शनही भरवले जाणार असल्याच्या चर्चाही एेकायला येऊ लागल्या अाहेत.
दरवर्षी उन्हाळ्याच्या झळा लागल्यानंतरच या चर्चा झडतात, मात्र पावसात पाणी अडविण्यासाठी, ते जिरविण्यासाठी ते संवर्धनासाठी राेटरीने तरुणांना साेबत घेऊन काम सुरू केले अाहे. नुकतेच पेठ तालुक्यात ८० तरुणांनी एकत्र येत एकाच दिवसात ९० फूट लांबीचा बाेरी बंधारा एका दिवसात उभा केल्याचे उदाहरण ताजे असतानाच अाता शाळेतील विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाबाबत काय वाटते? हे जाणून घेण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. गंजमाळ येथील राेटरी हाॅलमध्ये दाेन सत्रात झालेल्या या स्पर्धेत दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग नाेंदविला. विद्यार्थ्यांच्या मनातील कागदावर उमटलेल्या या चित्ररूपी संकल्पना नाशिककरांना मार्च राेजी याच हाॅलमध्ये भरविल्या जाणार असलेल्या प्रदर्शनात पहायला मिळणार अाहेत. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांचा गाैरव हाेईल, अशी माहिती विक्रम बालाजीवाले यांनी िदली. स्पर्धेप्रसंगी राेटरीचे सचिव अनिल सुकेणकर, प्रा. वैशाली चाैधरी, अतुल अग्रवाल, राजेश्वरी बालाजीवाले, हेमराज राजपूत, परिताेष माळवी अादी उपस्थित हाेते.

१११वा वर्धापनदिन रॅलीद्वारे साजरा
राेटरीचा १११वा वर्धापनदिन स्थानिक राेटरी क्लबच्या सदस्यांनी विशेष रॅली काढून रविवारी साजरा केला. गंजमाळ येथील राेटरी हाॅल येथून सुरू झालेली ही रॅली शालिमार, सीबीएस सिग्नल, एम. जी. राेड, शालिमारमार्गे पुन्हा राेटरी हाॅलपर्यंत काढण्यात अाली. रॅलीत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डाॅ. निखिल किबे, राजीव शर्मा, अार. जी. देवधर, रूपाली जायखेडकर अादी पदाधिकाऱ्यांसह सतरा राेटरी क्लबच्या पदाधिकारी सदस्यांचा सहभाग हाेता.