आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बड्या घरचा श्वान, ताे वाढवी मान अन् अपमान...भरकटलेल्या ‘रॉट- विलर’वर महापौरांची भूतदया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘बड्या घरचा श्वान, त्याचा तिन्ही लोकी मान' या म्हणीचा प्रत्यय येतच राहतो. नाशिककर मात्र या बड्या घरच्या श्वानांचा विराेधीभासी अनुभव घेत अाहेत. भरकटलेल्या राॅटविलर जातीच्या अतिअाक्रमक श्वानाला महापाैरांनी काही दिवसांपासून अभय दिले असून, त्याच्या मालकाचा शाेधही ते ‘युद्ध’पातळीवर घेत अाहेत.
दुसरीकडे महापालिकेतीलच एका कार्यकारी अभियंत्याच्या मालकीच्या ‘राॅटविलर’च्या त्रासाला कंटाळून पंडित काॅलनीतील नागरिकांनी चक्क पाेलिस ठाण्यात धाव घेतली अाहे.श्वान हा विषय नाशिककरांसाठी तसा संवेदनशील. भटक्या श्वानांनी नाशिककरांना ‘सळाे की पळाे’ करून साेडले असताना काहींचे पाळीव श्वानही लाेकांसाठी डाेकेदुखी ठरत अाहेत.
अतिशय अाक्रमक अाणि भयानक म्हणून समजल्या जाणारा राॅटविलर जातीचा श्वान महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी पंडित काॅलनीतील निवासस्थानी पाळला अाहे. त्यांची ही हाैस मात्र परिसरातील नागरिकांना चांगलाच घाम फाेडत अाहे. या श्वानाची जबाबदारी असणारा व्यक्ती जेव्हा त्याला फिरवायला निघते, तेव्हा परिसरातील नागरिक अक्षरश: जीव मुठीत धरून बसतात. सरकारवाडा पाेलिस ठाण्यात दाखल तक्रारीत या दहशतीचे वर्णन नागरिकांनी केले अाहे. त्याला चक्कर मारायला नेणाऱ्या व्यक्तीलाही ताे कधी-कधी जुमानत नाही.
चक्कर मारणाऱ्याच्या हातातून त्याच्या गळ्यातील दाेरी सुटली, तर मग रस्त्यावरील लाेकांनी जीव कसा वाचवता येईल याचीच काळजी करावी, अशी स्थिती आहे. दुसरीकडे महापाैर अशाेक मुर्तडक यांना बेवारस अवस्थेत सापडलेल्या राॅटविलर श्वानाचीही सध्या चर्चा अाहे. नांदूरनाका येथील एका हाॅटेलमालकाने महापाैरांना हा बेवारस श्वान दाखविला. महापाैरांनी त्यावर हात फिरवताच ताे शेपूट हलवू लागला.
माणसाकडे पाहून शेपूट हलविणारा श्वान हा खरा पाळीव समजावा, असा अनुभव महापाैरांचा असल्याने ते त्याला अापल्या घरी घेऊन गेले. त्याला खाऊपिऊ घातले. त्याच्या मालकाचा शाेधही महापाैर घेत अाहेत. त्यासाठी त्यांनी व्हाॅट्सअॅपवर त्याचे छायाचित्र शेअर केले अाहे.

राॅटविलरचे दाेष

अतिशयचपळ, तसेच अाक्रमक स्वभाव.
मालकांवरही हल्ला केल्याची अनेक उदाहरणे.

राॅटविलरचे गुण

सुरक्षारक्षकम्हणून काम करणारा श्वान
अन्य श्वानांपेक्षा अतिशय ताकदवान