आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांकडील श्वानाला अखेर मिळाला मालक...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापाैरांनी अाश्रय दिलेल्या राॅटविलर श्वानाची अखेर त्याच्या मूळ मालकाशी भेट झाली. या श्वानाला त्याच्या मालकाला अानंदाने जवळ घेत घरी नेले. दरम्यान, या श्वानावर दावा सांगत अन्य दाेघांनीही महापाैरांना बनविण्याचा प्रयत्न केला. परंतु, श्वानप्रेमी अाणि अभ्यासक महापाैरांनी या दाेघांना घरचा रस्ता दाखविला.
काही दिवसांपूर्वी महापाैर अशाेक मुर्तडक यांना राॅटविलर जातीचा श्वान नांदूरनाका परिसरातील हाॅटेलजवळ अाढळला हाेता. अतिशय अाक्रमक असलेल्या या श्वानाने महापाैरांकडे बघत शेपूट हलविल्याने त्यांनी त्याला अापल्याबराेबर घेतले अाणि अापल्या श्वानगृहात त्याची देखभाल केली. या श्वानाचा मालक सापडावा म्हणून त्यांनी माेठे प्रयत्न केले. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’त शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे संबंधित श्वानाचा मालक महापाैरांकडे पाेहोचला. हा श्वान दाेन महिन्यांपूर्वीच त्यांच्या घरी अाल्याचे त्यांनी सांगितले. हा श्वान अतिशय महागडा असल्याने त्याच्यावर मालकी हक्क दाखविण्यासाठी अन्य दाेघेही महापाैरांकडे अाले. मात्र, श्वानाने त्यांना प्रतिसाद दिल्याने महापाैरांनी त्यांना घरचा रस्ता दाखविला.

पंडित काॅलनीतील अभियंत्याला समज : महापालिकेतील कार्यकारी अभियंता असलेल्या अधिकाऱ्याच्या राॅटविलरचा त्रास पंडित काॅलनीतील रहिवाशांना सहन करावा लागत अाहे. यासंदर्भातील तक्रार अर्जानंतर पाेलिसांनी संबंधिताला समज देत श्वानाचा नागरिकांना त्रास हाेणार नाही याची खबरदारी घेण्याचा सल्ला दिला.

राॅटविलर श्वानांवर अमेरिकेत बंदी

राॅटविलर जातीचा श्वान अतिशय अाक्रमक स्वभावाचा असताे. मालकांवर झडप घालण्याचे प्रकारही राॅटविलरने केल्याची उदाहरणे अाहेत. अमेरिकेत तर हा श्वान पाळण्यास बंदी अाहे. भारतात मात्र अशी बंदी नसल्यामुळे अनेकांकडे या जातीचा श्वान सर्रासपणे अाढळताे. काहींनी त्याला पिंजऱ्यात बंद करून ठेवले अाहे, तर काहींनी जाड साखळीने त्याला बांधून ठेवले अाहे. अशा श्वानांचा मालकांनीच बंदाेबस्त करावा, अशी मागणी पुढे अाली अाहे.