आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RPI President Athawale Calls Aamir\'s Statement \'unwarranted\'

आमिर देश सोडून गेला तर त्याला परत आणू - रामदास आठवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘भारतात वाढलेल्या असहिष्णुतेमुळे पत्नीची देश साेडून जाण्याची इच्छा हाेती,’ हे अभिनेता अामिर खानचे वक्तव्य दुर्दैवी अाहे. अामिर एक सामाजिक अभिनेता असून वादग्रस्त विधाने करणे त्याने टाळले पाहिजे. मात्र प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असून लाेकशाहीत त्याचा विचार हाेणे अपेक्षित अाहे. जर खरंच अामिर खान देश साेडून गेला तर त्याला अाम्ही परत भारतात अाणू, अशी भूमिका रिपाइंचे अध्यक्ष रामदास अाठवले यांनी मंगळवारी व्यक्त केली. ‘राज्याच्या व केंद्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंला मंत्रिपद मिळावे,’ अशी मागणी करताना अापण राज्यात येणार नसल्याचेही अाठवलेंनी स्पष्ट केले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, आमिर खानविरोधात निदर्शने..
अामिर खानचे विधान म्हणजे अतिरेकच : विखे पाटील