आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका कर्मचाऱ्यांना १४ हजार रुपये बाेनस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका कर्मचाऱ्यांना उशिरा का हाेईना दिवाळीचे सानुग्रह अनुदान जाहीर झाले असून, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी मनसेने कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बंपर साेडतच जणू काढल्याचे चित्र अाहे. १४ हजार सानुग्रह अनुदान दिले जाणार असून, साेबत लाख रुपयांचा अपघात विमाही मिळणार अाहे. महापालिकेतील कायम, मानधनावरील, तसेच रोजंदारीवरील हजार ४२८ कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार असून, तिजोरीवर तब्बल ११ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
महासभेत पालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा विषय गाजला हाेता. महापौर अशोक मुर्तडक यांच्या अादेशानुसार शनिवारी सकाळी बैठक झाली. यावेळी पालिका आयुक्त अभिषेककृष्णा, उपमहापौर गुरमित बग्गा, स्थायी समिती सभापती सलीम शेख, म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेचे अॅड. शिवाजी सहाणे, सीटू संलग्न कामगार-कर्मचारी संघटनेचे अॅड. तानाजी जायभावे, सफाई कर्मचारी संघटनेचे सुरेश मारू, सुरेश दलोड, शिवाजी चुंभळे, विलास शिंदे आदी उपस्थित हाेते. गतवर्षी पालिकेने दिवाळीनिमित्त १३,५०० रुपये सानुग्रह अनुदान दिले होते. मात्र यंदा सिंहस्थ कुंभमेळा अतिरिक्त काम करून पार पाडणे तसेच वाढती महागाईच्यापार्श्वभुमीवर १७,५०० ते २१ हजार रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान देण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली. दुसरीकडे महापालीकेने अर्थिक परिस्थीती नाजुक असल्याचे कारण देत ११ हजार रुपयांपर्यंतच सानुग्रह अनुदान दिले जावे असा युक्तीवाद केला. दरम्यान प्रर्दीघ चर्चनंतर महापाैरांनी महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावरील सर्व अधिकारी, कायम कर्मचारी, अंगणवाडी, मानधन, रोजंदारीवरील सर्व कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १४ हजार सानुग्रह अनुदानाचा लाभ देण्याची घाेषणा केली.मनपाच्या ५३३१ कायम कर्मचारी, १०९०अंगणवाडी, रोजंदारी मानधनावरील, तर १०१७ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबास एक दिवसाचे वेतन : महापालिका कर्मचाऱ्याचे सेवेत निधन झाल्यास त्यांना पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन दिले जाणार आहे. स्थायी समिती सभापती सलीम शेख यांनी यासंदर्भात प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वांनीच अनुमाेदन दिले.

एक लाखाचा वैद्यकीय, पाच लाखांचा अपघात विमा
यंदा प्रथमच एक लाखाचा वैद्यकीय, तर पाच लाखांच्या अपघाती विम्याची योजना लागू करण्यात अाली असून, त्यात प्रति कर्मचारी दोन हजार रुपयांचा हफ्ता असणार आहे. त्यात एक हजार रुपये महापालिका, तर एक हजार कर्मचाऱ्याकडून घेतले जाणार अाहे. त्यामुळे कायम कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानापोटी प्रत्यक्ष १३ हजार रुपये हाती पडणार आहे. अंगणवाडी, मानधन रोजंदारी, तसेच शिक्षक-शिक्षकेतर आणि कामगार कल्याण निधीकडे नोंद नसलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र दाेन हजार रुपये हफ्ता स्वत:च भरावा लागणार अाहे. परिणामी, त्यांच्या हातात १२ हजार रुपये सानुग्रह अनुदान पडणार आहे.

बातम्या आणखी आहेत...