आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेस कामगारांना सव्वाशेचे नाणे भेट, डॉ. आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून सोहळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेसमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दोन्ही प्रेससह ७०० कामगारांना डॉ. आंबेडकरांची प्रतिमा असलेले आणि समता वर्षानिमित्त तयार करण्यात आलेले सव्वाशे रुपयांचे नाणे देण्यात आले.

करन्सी नोट प्रेसचे जनरल मॅनेजर एस. पी. वर्मा, उपमहाप्रबंधक मनीशंकर यांच्या हस्ते या नाण्यांचे वाटप करण्यात आले. नाशिकरोड परिसरातील आयएसपी सीएनपी या दोन्ही प्रेसमध्ये आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी मुंबई येथील टांकसाळीत तयार झालेले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले सव्वाशे रुपयांचे आणि दहा रुपये मूल्याचे नाणे दोन्हीही प्रेसच्या कामगारांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. नाणे वाटपाप्रसंगी अधिकाऱ्यांनी या नाण्यांच्या निर्मितीमागील संकल्पना आणि वाटपाचा हेतू याबद्दल मनोगत व्यक्त केले.

या वेळी महापात्र, दुर्गाप्रसाद, भूषण कुलकर्णी या प्रेसच्या अधिकाऱ्यांसह मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, माधव लहानगे, सुनील अहिरे, राजेश टाकेकर, नंदू पाळदे, शिवाजी कदम, जयराम कोठुळे, रमेश खुळे, विलास भालेराव, दिनकर खर्जुल, इरफान शेख, उत्तम रकिबे, अशोक पेखळे, ज्ञानेश्वर गायकवाड, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, अशोक अहिरे, प्रवीण बनसोडे, हेमंत खापरे मजदूर संघ प्रतिनिधी, वर्क्स कमिटीचे सदस्य, वेल्फेअर समितीचे सदस्य सोसायटी संचालक उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...